परदेशात राहतात सनी देओलच्या बहिणी, असं आहे संपूर्ण कुटूंब

परदेशात राहतात सनी देओलच्या बहिणी, असं आहे संपूर्ण कुटूंब

सनी देओल हा धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मोठा मुलगा आहे. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी या मथुरा येथून भाजपच्या खासदार आहेत.

  • Share this:

मुंबई, २३ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून तो यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बॉलिवूडमधील टॉप अक्शन हिरोमध्ये सनीचं नाव घेतलं जातं. सनीचं मूळ नाव अजय सिंग देओल असं आहे. त्याला घरात सगळे सनी नावाने हाक मारतात, त्यामुळे सिनेमांमध्ये येताना त्याने याच नावाचा वापर करण्याचं ठरवलं.

या मुस्लिम अभिनेत्रीशी मनोज वाजपेयीने केलं होतं दुसरं लग्न

सनी देओल हा धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मोठा मुलगा आहे. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी या मथुरा येथून भाजपच्या खासदार आहेत. धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल ही चार मुलं आहेत. सनीच्या दोन्ही बहिणी अजीता आणि विजेता अमेरिकेत राहतात. त्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून फार लांब आहेत.

धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांच्यासोबत कसं आहे सनी देओलचं नातं?

धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनाही ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. सनीच्या पत्नीचं पूर्ण नाव पूजा देओल आहे. पूजा सार्वजनिक ठिकाणी फार कमी दिसते. १९८४ मध्ये सनीने पूजाशी लग्न केलं. सनीला करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. करण दओल लवकरच पल पल दिल के पास सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. येत्या १९ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

लोकसभा निवडणूक 2019- सनी देओलची भाजपमध्ये एण्ट्री, पंजाबच्या या जागेवरून लढवू शकतो निवडणूक

सनी देओलच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर १९८३ मध्ये बेताब सिनेमातून सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी सनी बर्मिंघममध्ये अभिनय शिकण्यासाठी गेला होता.

सनीने सनी देओल ने 'घायल', 'दामिनी', 'डर', 'बॉर्डर', 'गदर', 'क्रोध', 'आग का गोला', 'हिम्मत', 'फर्ज', 'ये रास्ते हैं प्यार के', अर्जुन पंडित, 'जो बोले सो निहाल' आणि 'बिग ब्रदर' या सिनेमांसारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. एवढंच नाही तर सनीच्या सिनेमांचे संवादही तेवढेच हिट झाले. आजही त्याच्या गदर सिनेमातील संवाद प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. गदर सिनेमातील त्याची अमिषा पटेलसोबतची केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडली होती.

नवरा असावा तर असा! मिलिंद सोमणनं लग्नातील UNSEEN VIDEO केला शेअर

नुकतेच त्याने 'मोहल्ला अस्सी' आणि 'भैयाजी सुपरहिट' सिनेमात काम केलं होतं. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले होते. आता तो ब्लँक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमातून डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या