कधी बँकेत कॅशिअरचं काम करायचे CID चे एसीपी प्रद्युमन, घरा- घरात माहितीये त्यांचं नाव

२००४ मध्ये सीआयडीचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं आहे.

  • Share this:

टीव्ही मालिका सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युमन ही व्यक्तिरेखा साकारून २० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांचा आज ६९ वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आम्ही आज तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत.

१९९८ मध्ये सुरु झालेली ही मालिका तब्बल २० वर्ष चालली. २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात ही मालिका बंद झाली.

शिवाजी साटम यांनी हिंदी आणि मराठीतील अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. आपल्या उक्तृष्ट अभिनयामुळे त्यांनी अनेक पुरस्कारांवर आपलं नावंही कोरलं.

कोणत्याही सुपरस्टारपेक्षा त्यांचं फॅनफॉलोविंग कमी नाही. वास्तव, गुलाम- ए- मुस्तफ, यशवंत, नायक यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या साटम यांना सीआयडी मालिकेमुळे देशभरात प्रसिद्धी मिळाली.

एसीपी प्रद्युमन या व्यक्तिरेखेने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली. त्यांच्या व्यक्तिरेखेवर अजूनही सोशल मीडियावर मीम्स आणि जोक व्हायरल होतात.

सीआयडी मालिकेच्या चित्रीकरणावेळी त्यांना अनेकदा अपघातांना सामोरं जावं लागलं. मात्र तरीही त्यांनी मालिकेत काम करणं बंद केलं नाही.

साटम यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८७ मध्ये केली. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी ते सेंट्रल बँकमध्ये कॅशिअर होते.

२००४ मध्ये सीआयडीचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं आहे. १११ मिनिटांचा एपिसोड एकही शॉट कट न करता एका टेकमध्ये केल्याचा विक्रम या मालिकेने केला.

शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजीत साटम हा अभिनेता आणि निर्माता आहे. त्यांची सून मधुरा वेलणकर- साटमही प्रख्यात अभिनेत्री आहे. अभिजीत आणि मधुराला एक मुलगाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 10:56 AM IST

ताज्या बातम्या