लोकनाट्याचा 'राजा' हरपला; राजा मयेकर यांचं निधन

लोकनाट्याचा 'राजा' हरपला; राजा मयेकर यांचं निधन

90 वर्षीय राजा मयेकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं आज दुपारी 12 वाजता निधन झालं. 90 वर्षीय राजा मयेकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याचं स्पष्ट केलं.

‘लोकनाटयाचा राजा’असा किताब मिळवणा-या मयेकर यांनी तब्बल 60 वर्ष अभिनयाचं क्षेत्र गाजवलं. वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका त्याकाऴी प्रचंड गाजली होती.

नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केलं होतं. दशावतारी नाटकापासून राजा मयेकर यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला होता. ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’ आणि ‘असुनी खास घरचा मालक’ ही तीन लोकनाटय़ं तुफान गाजली होती. शिवाय ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’ या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

राजा मयेकर यांचं अभिनयात पहिलं पाऊल पडलं ते कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळं. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना याचा उल्लेख ते नेहमीच करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Feb 15, 2020 03:24 PM IST

ताज्या बातम्या