गुजरातच्या निकालांवरून अभिनेता प्रकाश राज यांची मोदींवर टीका

गुजरातच्या निकालांवरून अभिनेता प्रकाश राज यांची मोदींवर टीका

गुजरातमधील भाजपच्या मिशन 150वरून अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलंय. ''पंतप्रधान मोदीजी, गुजरातच्या विजयाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन, पण भाजप 150 चं टार्गेट का गाठू शकलं नाही. असा खडा सवाल प्रकाश राज यांनी मोदींना विचारलाय.

  • Share this:

19 डिसेंबर, बंगळुरू : गुजरातमधील भाजपच्या मिशन 150वरून अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलंय. ''पंतप्रधान मोदीजी, गुजरातच्या विजयाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन, पण भाजप 150 चं टार्गेट का गाठू शकलं नाही. विकासाच्या मुद्यावर तुम्ही विरोधकांना संपवू का शकला नाहीत ? तुमची विभाजनाची रणनिती गुजरातमध्ये चालली नाही का ? आपल्या देशात जात, धर्म, पाकिस्तान यापेक्षाही अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. गुजरातच्या निवडणुकीत तुम्हाला ग्रामीण मुद्दे ऐकू आले असतीलच, गुजरातच्या निवडणुकीत कदाचित तेच मुद्दे पुन्हा ऐरणीवर आलेत. निकालावरून तरी तेच दिसतंय.'' अशा शब्दात प्रकाश राज यांनी मोदींना पुन्हा लक्ष्यं केलंय.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासातील दिरंगाईवरूनही प्रकाश राज यांनी मध्यंतरी मोदींवर टीकास्त्रं सोडलं होतं. प्रकाश राज हे गौरी लंकेश यांच्या अतिशय जवळचे स्नेही मानले जात होते. म्हणूनच त्यांनी गौरी लंकेश हत्येसंदर्भात मोदींच्या मौनाबाबत जाहीरपणे भाष्य केलं होतं.

First published: December 19, 2017, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading