News18 Lokmat

'जयकांत शिक्रें'ची आणखी एक मोठी घोषणा, या जागेवरून लढणार लोकसभा निवडणूक

गेल्या काही दिवसांआधी 'मी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे,' अशी ट्विटरवरून घोषणा करणाऱ्या प्रकाश राज यांनी स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 5, 2019 11:01 PM IST

'जयकांत शिक्रें'ची आणखी एक मोठी घोषणा, या जागेवरून लढणार लोकसभा निवडणूक

नवी दिल्ली, 05 जानेवारी : गेल्या काही दिवसांआधी 'मी  2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे,' अशी ट्विटरवरून घोषणा करणाऱ्या प्रकाश राज यांनी स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली आहे.

अभिनेता प्रकाश राज हे 2019च्या लोकसभा निवडणुका बंगळुरू सेंट्रलमधून अपक्ष लढणार आहेत. अशी घोषणा त्यांनी शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. निवडणुकांसंदर्भातली संपूर्ण माहिती काही दिवसातच माध्यमांना सांगितली जाईल असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, '2019च्या लोकसभा निवडणुका - माझ्या या नवीन यात्रेसाठी उत्साहजनक प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. मी बंगळुरूमधून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुका लढणार आहे. याबद्दलची माहिती लवकरच माध्यमांना देण्यात येईल'

दरम्यान, प्रकाश राज हे गेल्या काही काळापासून केंद्र सरकारवर परखड टीका करत आहेत. मोदी सरकारविरोधी कठोर भूमिकेसाठी ते चर्चेत आहेत. अशातच त्यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सिंघम' या चित्रपटात अभिनेते प्रकाश राज यांनी साकारलेल्या 'जयकांत शिक्रे' या खलनायकी पात्राद्वारे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.




कोण आहेत प्रकाश राज?

मूळचे कर्नाटकचे असणाऱ्या प्रकाश राज यांनी कन्नड टेलिव्हिजनपासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर कन्नड, तामिळ सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची मोहर उमटवली. दक्षिण चित्रपटांत आपल्या भूमिका चोख बजावणाऱ्या प्रकाश राज यांनी नंतर बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यांची बॉलिवूडमधील एंट्रीही यशस्वी ठरली.

मोदी सरकारवर हल्लाबोल

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या लोकांना ट्विटरवर फॉलो करतात, असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

त्यानंतर आक्रमक झालेल्या प्रकाश राज यांनी पुढे अनेक मुद्द्यांवरून सरकारविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे.


VIDEO : 'बिहारी लोक राहतात इथं आणि त्यांना तिकडं मुलं होतात', भाजप आमदारांचं वादग्रस्त विधान


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...