प्रेमाचा धक्कादायक अंत, अभिनेत्याने मॉडेल पत्नीला इतकं मारलं की...

प्रेमाचा धक्कादायक अंत, अभिनेत्याने मॉडेल पत्नीला इतकं मारलं की...

हुंड्यासाठी पतीने केलेल्या मारहाणीमध्ये पत्नीच्या कानाचा पडदाच फाटल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

  • Share this:

इंदौर, 06 नोव्हेंबर : हुंड्यासाठी पती रोज मारहाण करतो असा आरोप एका अभिनेत्यावर त्याच्या मॉडेल पत्नीकडू करण्यात आला आहे. हुंड्यासाठी पतीने केलेल्या मारहाणीमध्ये पत्नीच्या कानाचा पडदाच फाटल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. बरं इतकंच नाही तर मारहाण केल्यानंतर पतीने पत्नीला कायमचं सोडून दिल्याचंही पीडित मॉडेल तरुणीने म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी 30 वर्षीय स्वाती मेहरा असून ती व्यवसायाने मॉडेल आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत स्वाती यांनी आरोप केला आहे की, सुदामा नगर येथे राहणाऱ्या कर्ण शास्त्री सोबत तिचे 13 फेब्रुवारी 2019 रोजी लग्न केले होते. पण त्यानंतर कर्णकडून स्वातीचा छळ करण्यात आला. हुंड्यासाठई तिला रोज मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये स्वातीच्या कानाचा पडदा फाटल्याचं तिने तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

जून 2018 मध्ये मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्वाती आणि कर्णची भेट झाली. या चित्रपटात कर्ण मुख्य भूमिकेत होता. या मैत्रीनंतर त्या दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले. त्यांची मैत्री लग्नापर्यंत पोहोचली. पण लग्नाच्या दुसर्‍या महिन्यातच त्यांच्यात पैशांवरून वाद होण्यास सुरुवात झाली. हुंड्यासाठी स्वातीची रोज मारहाण सुरू झाली.

BIG BREAKING - महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी, अमित शहांकडून 'इट्स फायनल'

स्वातीचा आरोप आहे की, कर्णने तिला कित्येक वेळा मारहाण केली. यामध्ये तिच्या कानाचा पडदा फाटला. या प्रकरणाविरोधात स्वातीने मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून त्याबद्दल द्वारकापुरी पोलीस ठाण्यात कळवण्यात आलं आहे. तर या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, स्वाती माझ्यासोबत राहत नाही. ती वेगळी राहते अशी माहिती कर्णने पोलिसांना दिली आहे. आम्ही दोघांनी मिळून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं कर्णने म्हटलं आहे. बरं इतकंच नाही तर मी आतापर्यंत तिच्यावर हात उचलला नसल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं. कर्णच्या या माहितीनुसार आणि स्वातीच्या तक्रारीनुसार पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर स्वातीच्या कानावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 6, 2019, 9:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading