लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांतच ‘जिस्म 2’ चा अभिनेता घेतोय घटस्फोट

लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांतच ‘जिस्म 2’ चा अभिनेता घेतोय घटस्फोट

'आम्ही फार प्रयत्न केले. प्रोफेशनल काउंसलिंग आणि वेगळं होण्यापूर्वीचं ट्रायल या सर्व गोष्टी आमच्यातलं अंतर मिटवू शकली नाही.'

  • Share this:

मुंबई, 11 मे-  बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंगच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अरुणोदयने जवळपास अडीच वर्षांचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल स्वतः अरुणोदयने सोशल मीडियावर सांगितलं. अरुणोदयच्या पत्नीचं नाव ली एलटन असून ती मुळची कॅनेडाची आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता.

इन्स्टाग्रामवर अरुणोदयने लिहिले की, ‘मी गेल्या काही दिवसांपासून काही लिहित नव्हतो. यामागे एक कारण होतं, जे फार दुःख देणारं आहे. माझं लग्न संपुष्टात येत आहे. आम्ही प्रेमात फार चांगले होतो, पण वास्तवात तसं काही झालं नाही. आम्ही फार प्रयत्न केले. प्रोफेशनल काउंसलिंग आणि वेगळं होण्यापूर्वीचं ट्रायल या सर्व गोष्टी आमच्यातलं अंतर मिटवू शकली नाही.’

आपल्या सावत्र आईपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे 'ही' अभिनेत्री

अरुणोदय पुढे म्हणाला की, ‘आता हेच योग्य आहे की इथेच थांबावं. मला वाटतं की आम्ही दोघांनाही यापेक्षा जास्त चांगलं काही मिळेल. आम्ही दोघंही एकमेकांचा सन्मान करत यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू.’ अरुणोदय आणि लीची पहिली भेट गोव्यात झाली होती. लीचं स्वतःचं गोव्यात एक रेस्टॉरन्ट आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी हिंदू पद्धतीने मध्यप्रदेशच्या भोपाल येथे राजेशाही थाटात लग्न केलं.

VIDEO- ‘अरे, किमान दरवाजा तरी बंद करत जा...’, शाहिद कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

या दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अरुणोदय आणि ली यांनी १३ डिसेंबर २०१६ मध्ये लग्न केलं होतं. या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली असतो. २००९ मध्ये ‘सिकंदर’ सिनेमातून अरुणोदयने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर ‘आएशा’, ‘ये साली जिंदगी’, ‘जिस्म २’, ‘मैं तेरा हीरो’, पिझ्झा, ‘उंगली’, ‘मिस्टर एक्स’, ‘ब्लॅकमेल’ आणि ‘मोहनजोदडो’ यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

मातृत्व बेतू शकत होतं जीवावर, तरीही चौथ्यांदा आई झाली हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री

अरुणोदय सिंगला ‘ये साली जिंदगी’ सिनेमातील त्याच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या यादीत नामांकन मिळालं होतं. नुकतंच अरुणोदयने ALT बालाजीच्या ‘अपहरण’ वेबसीरिजमध्ये काम केलं.

'तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,' ब्रेकअपनंतर सलमानने काढला तिच्यावर राग

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

First published: May 11, 2019, 4:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading