अभिनेता अली असगरसोबत झाला अपघात, ट्रकला जाऊन धडकली कार

अभिनेता अली असगरसोबत झाला अपघात, ट्रकला जाऊन धडकली कार

'द कपिल शर्मा शो' आणि 'कानपुरवाले खुरानाज' यांसारख्या लोकप्रिय कॉमेडी शोमधला लोकप्रिय अभिनेता अली असगरसोबत एक मोठा अपघात झाला.

  • Share this:

मुंबई, १२ मार्च २०१९- 'द कपिल शर्मा शो' आणि 'कानपुरवाले खुरानाज' यांसारख्या लोकप्रिय कॉमेडी शोमधला लोकप्रिय अभिनेता अली असगरसोबत एक मोठा अपघात झाला. या अपघातात तो थोडक्यात बचावला. अली असगरची गाडी सिग्नलवर थांबली होती. तेव्हाच एक वेगवान गाडी समोरून आली आणि त्याने अलीच्या गाडीला टक्कर दिली. यामुळे त्याची गाडी ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. अलीने सोशल मीडियावर ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्याने मुंबई पोलिसांचे आभारही मानले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अली म्हणाला की, ‘मी स्वतः गाडी चालवत होतो, माझी गाडी सिग्नलवर उभी होती तेव्हा मला फार मोठा आवाज आला आणि माझी गाडी समोर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. देवाच्या कृपेने मला काही झालं नाही. पण जर गाडी सुरू असताना हे झालं असतं तर? लोक अशी गाडी का चालवतात?’

VIDEO: सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाण म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading