अक्षयला सासूसोबतच जायचं होतं डेटला, मारायच्या होत्या या गोष्टींवर गप्पा

अक्षयला सासूसोबतच जायचं होतं डेटला, मारायच्या होत्या या गोष्टींवर गप्पा

करणसोबत गप्पा मारताना त्याने सासू डिंपल कपाडियाबाबत एक वक्तव्य केलं की हा व्हिडिओ डिलीट केला होता.

  • Share this:

मुंबई, ०४ फेब्रुवारी २०१९- कॉफी विथ करणमध्ये अनेकदा सेलिब्रिटी मोठमोठे खुलासे करत असतात. अनेकदा तर अशा गोष्टी समोर येतात की प्रेक्षक अवाक् होतात. असाच एक खुलासा अक्षय कुमारने करणच्या या शोमध्ये केला.

हा एपिसोड गेल्या सिझनचा आहे. अक्षय पहिल्यांदा कॉफ विथ करणमध्ये आला होता. करणसोबत गप्पा मारताना त्याने सासू डिंपल कपाडियाबाबत एक वक्तव्य केलं की हा व्हिडिओ डिलीट केला होता. मात्र नंतर हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

जो व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला जात आहे तो मूळ एपिसोडमध्ये नव्हता. अक्षयचा एपिसोड सर्वांनाच फार आवडला होता. बॉलिवूडमधील अनेक मसालेदार गोष्टींवर करण आणि अक्षयने गप्पा मारल्या होत्या.

याचवेळी करणने अक्षयला विचारलं की, ‘जर तुझं लग्न झालं नसतं तर तू कोणाला रोमँटिक डेटवर घेऊन गेला असतास?’ या प्रश्नाचं उत्तर देताना अक्षयने काही सेकंदाचा विचार केला. नंतर तो म्हणाला, ‘डिंपल कपाडिया. मी त्यांच्यासोबत डेटवर गेलो असतो आणि पूर्णवेळ त्यांच्या मुलीबद्दल बोललो असतो.’

तुम्हीच हा व्हिडिओ पाहा आणि अक्षय कुमारने करणने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं कशी दिली तेही पाहा.

First published: February 4, 2019, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading