चांदनी चौकमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतो अक्षय कुमार

चांदनी चौकमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतो अक्षय कुमार

लोकसभा निवडणूक २०१९ च्या रणशिंग फुंकले गेले आहे. नावाजलेल्या कलाकारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षात चुरशीची लढत सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, १५ मार्च २०१९- लोकसभा निवडणूक २०१९ च्या रणशिंग फुंकले गेले आहे. नावाजलेल्या कलाकारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षात चुरशीची लढत सुरू आहे. अजूनपर्यंत ज्या जागेवर उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही ती जागा कोणाला देण्यात येणार याबद्दल तर्क लढवले जात आहेत. अक्षय कुमार चांदनी चौक येथून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या राजकीय वर्तुळात याबद्दल सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. भाजपचे उच्चस्तरीय मंडळ अयक्ष कुमारच्या सतत संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक माध्यमातून अक्षय कुमारच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे.

बुधवारी १३ मार्चला मोदी यांनी बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या कलाकारांना ट्वीटमध्ये टॅग केलं. यात अक्षयच्या नावाचाही सहभाग होता. मोदी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘थोडा दम लावा आणि मतदानाला एक सुपरहिट विषय करा.’ या ट्वीटला उत्तर देताना अक्षयने लिहिले की, ‘मतदानाला देश आणि नागरिकांमधील सुपरहिट प्रेमकथा केली पाहिजे. ही खऱ्या लोकशाहीची निशाणी आहे.’

दरम्यान, क्रिकेटचं मैदान गाजवणारा गौतम गंभीर आता राजकारणाच्या आखाड्यात आपलं नशीब आजमावणार असल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपकडून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून गौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे.

दरम्यान, सध्या मीनाक्षी लेखी या मतदारसंघातील खासदार आहेत. पण या मतदार संघातून आता गौतम गंभीरला संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून मीनाक्षी लेखींना अन्य जागेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पण अद्याप या चर्चांना अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.

हायप्रोफाइल जागा

आतापर्यंत नवी दिल्ली मतदारसंघातून चर्चेत असलेल्या चेहऱ्यांनाच निवडणूक लढवण्याची संधी दिली गेली आहे. पण आता समीकरण बदलत असल्याचे दिसत आहे. आम आदमी पार्टीला दणका देत काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीनं देखील दिल्लीच्या सहा जागांवर आपले उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरेंनी केले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक, पाहा UNCUT भाषण

First published: March 15, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading