मुंबई 14 जुलै : अभिनेता आमिर खान (Amir Khan) सध्या फारच चर्चेत आहे. नुकताच त्याचा घटस्फोट झाला आहे. पण पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे कारण त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण टीमवर प्रदूषण पसरवण्याचा आरोप लावला जात आहे. आमिरचा आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्डा’ची (Lalsingh Chadda) शुटींग लडाखमध्ये सुरू आहे त्यामुळे संपूर्ण टीम लडाखमध्येच आहे. पण तिथे त्याची संपूर्ण टीम कचरा परसवत असल्याचा आरोप काही स्थानीकांनी केला आहे.
दरम्यान आमिर खान प्रोडक्शनचा (Amir Khan Production house) हा आगामी चित्रपट आहे. सोशल मीडियावर तेथे कचरा होत असल्याचा एक व्हिडीओ एका युझरने शेअर केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर सातत्याने आमिर खान प्रोडक्शनवर कचरा पसरवण्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं की प्रोडक्शन हाऊसला अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल वरून त्यांची प्रतिक्रिया द्यावी लागली.
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) July 13, 2021
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी सांगीतलं आहे की, ज्यांना कोणाला या गोष्टीची चिंता वाटत असेल, “AKP स्पष्ट करत आहे की, एका कंपनीच्या रुपात आम्ही शुटींगच्या स्थानांना स्वच्छ ठेवण्याचा प्रोटोकॉल पाळत आहोत. आमच्याकडे एक टीम आहे जी ठरवते की शुटींगच्या जागेला कचरा रहीत कसं करायचं. प्रत्येक दिवशी, दिवसाच्या शेवटी संपूर्ण जागेची तपासणी केली जाते. संपूर्ण शेड्युलच्या शेवटी आम्ही ठरतो की, जेव्हा आम्ही एकादं स्थान सोडतो ते तितकचं स्वच्छ असलं पाहीजे, जितकं स्वच्छ ते आपल्याला मिळालं होतं.”
करिश्मा कपूरचा सासरी असा झाला होता छळ; घटस्फोटित पतीवर केले गंभीर आरोप
पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “आमच्या शुटींगच्या जागेवर स्वच्छता न ठेवल्याचे आरोप आमच्यावर लावले जात आहेत, आम्ही या गोष्टीचं पूर्णपणे खंडन करतो. आमच्या शुटींगचं मैदान खुलं आहे. आता अधिकारीही इथे येऊन चौकशी करू शकतात.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Bollywood, Entertainment