मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची लेक करतेय ‘या’ व्यक्तीला डेट, सोशल मीडिया पोस्टमध्ये केला खुलासा

इन्स्टाग्रामवर तिला एका चाहत्यानं तू कोणाला डेट करत आहेस का असा प्रश्न विचारला होता.

Megha Jethe | Updated On: Jun 13, 2019 10:43 AM IST

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची लेक करतेय ‘या’ व्यक्तीला डेट, सोशल मीडिया पोस्टमध्ये केला खुलासा

मुंबई, 13 जून : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानची लेक इरा खान मागच्या काही काळापासून काही ना काही कारणानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या बेली बटन आणि टॅटूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर आता ती तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इरानं मागच्या काही काळापासून तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून रिलेशनशिपबाबत असलेल्या तर्क वितर्कांना पूर्णविराम देत तिचं नातं कन्फर्म केलं आहे.

देसी गर्लनं घातली भारताच्या सन्मानात भर, प्रियांकाला ‘हा’ विशेष पुरस्कार जाहीर
इरानं ती म्यूझिशियन मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचं अखेर स्पष्ट केलं आहे. मागच्या काही काळापासून या दोघांच्याही सोशल मीडिया पोस्टवरुन वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. पण आता ते खरंच एकमेकांना डेट करत असल्यास समजतं. इरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशालला डेट करत असल्याचं कन्फर्म केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिला एका चाहत्यानं तू कोणाला डेट करत आहेस का असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना इरानं एक फोटो शेअर केला ज्यात ती बॉयफ्रेंड मिशाल कृपलानी सोबत दिसत आहे. या स्टोरीमध्ये इरानं मिशालला सुद्धा टॅग केलं आहे.

VIDEO : मराठीतील आत्तापर्यंतचं सगळ्यात बोल्ड गाणं रिलीज


मिशाल कृपलानी हा म्यूझिशियन असून इराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मिशालचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत. व्हॅलेंटाइन डे ला इरानं मिशालचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याशिवाय इराच्या वाढदिवसाला मिशालनंही खास मेसेज लिहित तिचा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू होती. मात्र आता या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली आहे.

हृतिक रोशनसोबत असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आमिर खाननं इरा आणि जुनैत दोघंही बॉलिवूड पदार्पण करू इच्छित असल्याचं सांगितलं होतं. मुलगा जुनैदला अभिनेता व्हायचं आहे तर इराला मात्र फिल्म मेकिंगमध्ये रुची आहे. इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. मागील वर्षी रमजानच्या काळआत इरासोबत शेअर केलेल्या एका फोटोमुळे आमिरला टीका सहन करावी लागली होती.

सलमान खानसाठी रोहित शेट्टीची माघार, आता 'या' दिवशी रिलीज होणार सूर्यवंशीबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 10:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close