राज्यभरात प्लास्टिक बंदीसाठी धडक कारवाई, लाखांचा दंड वसूल

राज्यभरात प्लास्टिक बंदीसाठी धडक कारवाई, लाखांचा दंड वसूल

  • Share this:

मुंबई, 23 जून : राज्यभरात आजपासून प्लास्टिकबंदी लागू झालीय. त्यामुळे शहराशहरात महापालिकेकडून प्लास्टिक बाळगण्याऱ्या दुकानांवर कारवाई सुरू झालीय. राज्यभरात लाखो रुपयांचा दंड वसूल केलाय.

ठाणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक आणि पुणे शहरातील दुकानांवर कारवाई करण्यात आलीये. या बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. तर सामान्य माणसाला कारवाईचा कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

ठाण्यातही ठाणे महानगरपालिकेचे विशेष मार्शल पथक प्लास्टिक बंदी साठी फिरत असून गावदेवी मार्केट येथे प्लास्टिक बंदी विरोधात कारवाई करण्यात आलीये. प्लास्टिकच्या पिशवीत कपडे घालून विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आलीये तर ठाणे मनपाने बाळू सावंत नावाच्या एका व्यक्तीला प्लास्टिक पिशवी बाळगल्या प्रकरणी ५ हजार रुपये दंड आकारलाय. त्याचबरोबर ठाणे मनपाने ७० किलो प्लास्टिक जप्त केले असून ४ जणांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारलाय.

पुणे महापालिकेने प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी जोरदार कारवाई सुरू केलीये.. शहराची मुख्य बाजारपेट असलेल्या लक्ष्मी रोड वर गेले चार दिवस व्यापाऱ्यांना माहिती दिली जात होती मात्र तरीही दुकानांमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या 12 व्यापाऱ्यांकडून सुमारे 3 हजार किलो प्लास्टिक जप्त करून कारवाई करण्यात आलीय.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनाच पडला प्लास्टिक बंदीचा विसर !

नाशिकमध्ये  प्लास्टिक बंदीच्या पहिल्या दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांची 7 विभागात धडक कारवाई केली. आतापर्यंत 350 किलो प्लास्टिक जप्त केलंय.  तर वापरकर्त्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली असून 3 लाख 60 हजार रक्कम दंड म्हणून वसूल केला आहे.

यवतमाळ नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक जप्तीची जोरदार मोहीम राबवायला सुरुवात केलीये. शहरातील दत्त चौक, मेनलाईन या मुख्य बाजार पेठेत असलेल्या दुकानात धाड टाकून  50 किलो प्लास्टिक जप्त केले.

आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी

पर्यावरणाचा ह्रास करणाऱ्या प्लास्टिक ला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी ला सुरुवात केली. पर्यावरण विभागाने प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीची अधिसूचना प्रसिद्ध केली.  त्या अनुशंगाने  कडक धोरण राबवत यवतमाल नगर परिषेद प्रशासनाने जप्तीला सुरवात केली. नगर परिषेदनं सुरू केलेल्या या कारवाईमुळे प्लास्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले.

मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांनी स्वतः दुकानांमध्ये जाऊन प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केलं.

पहिल्या दिवसाची कारवाई, लाखोंचा दंड वसूल

पुणे- 3 लाख 69 हजार

नाशिक - 3 लाख 60 हजार

पिंपरी-चिंचवड - 3 लाख 40 हजार

सोलापूर - 2 लाख 15 हजार

नागपूर - 1 लाख 55 हजार

कोल्हापूर - 45 हजार

सांगली - 40 हजार

भिवंडी - 40 हजार

First published: June 23, 2018, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading