निवडणुकीच्या घोषणेनंतर कोल्हापुरात होणार मोठी कारवाई, तब्बल 1500 समाजकंटक हिटलिस्टवर!

निवडणुकीच्या घोषणेनंतर कोल्हापुरात होणार मोठी कारवाई, तब्बल 1500 समाजकंटक हिटलिस्टवर!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील दीड हजार समाजकंटकांची यादी पोलिसांकडून तयार करण्यात आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 21 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये 1500 समाजकंटक पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत. यामुळे निवडणुकांच्या आधी कोल्हापूरमध्ये एकच राजकीय खळबळ उडाली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील दीड हजार समाजकंटकांची यादी पोलिसांकडून तयार करण्यात आली आहे. तर यासाठी जिल्ह्यात 35 पथकं तयार करण्यात आली  आहेत. निवडणुकीच्या काळात ही 35 पथकं समाजकंटकांविरोधात काम करणार आहेत. 14 ठिकाणी कडक तपासणी आणि महत्त्वाचे नाके उभे करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या कठोर कारवाईमध्ये कोणाची नावं पुढे येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या दोन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. दोन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे.

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

इतर बातम्या - विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजेंना मोठा धक्का

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला.

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी उदयनराजेंनी भाजपसमोर काही अटी ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी असा आग्रह उदयनराजेंनी धरला होता. आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली आहे. मात्र सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही. त्यामुळे उदयनराजेंना हा धक्का मानला जात आहे.

VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 01:57 PM IST

ताज्या बातम्या