भारतीय रेल्वेचे 13, 500 दांडीबहाद्दर कर्मचारी निलंबित होणार !

धिकृतपणे न कळवता दीर्घकाळ रजेवर असणारे असे तब्बल १३,५०० कर्मचारी भारतीय रेल्वेत आढळून आलेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2018 02:42 PM IST

भारतीय रेल्वेचे 13, 500 दांडीबहाद्दर कर्मचारी निलंबित होणार !

10 फेब्रुवारी, नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई करण्याचे संकेत रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. अधिकृतपणे न कळवता दीर्घकाळ रजेवर असणारे असे तब्बल १३,५०० कर्मचारी भारतीय रेल्वेत आढळून आलेत.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अधिकाऱ्यांना अशा दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी एक व्यापक मोहीमच घेऊन त्यांची यादीच बनवायला सांगितली होती. त्यानुसार रेल्वेच्या 13 लाख कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 13, 500 कर्मचारी भारतीय रेल्वेत आढळून आलेत. या सर्व दांडी बहाद्दरांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यालयाने दिलेत. त्यामुळे या दांडीबहाद्दरांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...