वकील तरुणीच्या अंगावर अॅसिड फेकून गळ्यातली सोनसाखळी ओरबडली

गर्दीचा फायदा घेत वकील तरुणीसह तिच्या बहिणीच्या अंगावर अॅसिड फेकून गळ्यातली सोनसाखळी ओरबडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 05:53 PM IST

वकील तरुणीच्या अंगावर अॅसिड फेकून गळ्यातली सोनसाखळी ओरबडली

जळगाव,7 ऑक्टोबर: गर्दीचा फायदा घेत वकील तरुणीसह तिच्या बहिणीच्या अंगावर अॅसिड फेकून गळ्यातली सोनसाखळी ओरबडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी फुले मार्केटमध्ये ही घटना घडली. सोनसाखळी ओरबाडून पळणाऱ्या 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला रंगेहाथ अटक करण्यात आली. असा गंभीर प्रकार शहरात पहिल्यांदाच उघडकीस आल्याचे महिला आणि तरुणीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हर्षदा किशोर महाजन (वय-19, रा. बोदवड) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. हर्षदा उच्चभ्रू, उच्चशिक्षित असून ती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीबीएमची विद्यार्थिनी आहे.

मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी अॅड. पूजा ओमप्रकाश व्यास (वय-30, रा. बालाजी पेठ) या बहीण आरती व्यास हिच्यासह फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. या वेळी हर्षदा ही त्यांचा पाठलाग करत होती. तिने सोबत आणलेल्या बाटलीतील अॅसिड पूजा व आरतीच्या अंगावर फेकले. या वेळी अॅड. पूजा यांनी मागे वळून पाहिले तर हर्षदा अॅसिडच्या बाटलीला झाकण लावताना दिसली. तिला हटकल्यानंतर तिने पूजा यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून मागच्या बाजूने पसार होण्याचा प्रयत्न केला. पूजा, आरती यांनी आरडाओरड केली असता जमलेल्या लोकांनी आरोपी हर्षदाला पकडले. तिच्या हातातून तुटलेली सोनसाखळी घेऊन तिला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. अॅसिड सौम्य असल्याने अॅड. पूजा आणि आरतीला गंभीर दुखापत झाली नाही. अॅड. पूजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षदावर लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बॅगेत उग्र द्रवाची बाटली..

दरम्यान, पोलिसांनी आरोपी हर्षदाला ताब्यात घेतले आहे. तिच्या बॅगेत उग्र द्रवाची बाटली सापडली आहे. या बाटलीत सौम्य अॅसिड असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसही झाले सून्न..

Loading...

आरोपी हर्षदा ही बोदवड तालुक्यातील रहिवाशी आहे. तिचे वडील सधन शेतकरी असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. हे ऐकून पोलिस सून्न झाले आहेत. विशेष म्हणजे ती उच्चशिक्षित, उच्चभ्रू असूनही हर्षदाने असे का केले, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. हर्षदा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीबीएमचे शिक्षण घेत आहे. ती विद्यापीठाच्या वसतिगृहात राहते. पोलिसांनी हर्षदाच्या वसतिगृहातील खोली, सामानाची तपासणी केली. मात्र, विशेष असे काही सापडले नाही.

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...