पाटना, 9 मार्च : बिहारमधील (Bihar News) शेखपुरा येथे 2 लहानग्या मुलींवर सामूहिक बलात्काराचा (Gang Rape) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना बाल सुधार गृहात पाठविण्यात आलं आहे. दोन्ही मुलांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. वैद्यकीय तपासातदेखील गँगरेपची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात 4 अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. त्या आरोपींच्या कुटुंबाकडून वेळोवेळी माहिती घेतली जात आहे. याशिवाय घराजवळील भागातही छापेमारी सुरू आहे.
काय आहे प्रकरण
सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी सांगितलं की, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही मित्र मित्र मिळून ऑनलाइन पॉर्न व्हिडीओ पाहत होतो. सोमवारीही आम्ही व्हिडीओ पाहिला. सोमवारी सांयकाळी शेताजवळ गेलो तर तेथे दोन मुली शेतात काम करीत होत्या. आम्ही दोघींना उचललं आणि एकामागून एक दोघांवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर जेव्हा दोन्ही मुली रडू लागल्या तर एका मुलीच्या हातात 3रुपये दिले आणि कोणाला काही न सांगण्याची धमकी दिली. दोन्ही मुलांबद्दल ऐकल्यानंतर त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गँगरेपसारखा गुन्हा करणाऱ्या या आरोपींना केवळ बाल सुधार गृहात पाठविण्यात आलं आहे. कायद्याच बदल होण्याची मागणी केली जात असून आरोपींना जबर शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे.
सर्व आरोपी 13 वर्षांपेक्षा कमी...
पोलिसांनी सांगितलं की, गुन्ह्यात सामील सर्व मुलं 10 ते 12 वर्षांचे आहेत. तर दोन्ही मुली 8 वर्षांच्या आहेत. पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की, घटनेसंबंधात सोमवारी सायंकाळी पीडितेच्या आजीने गुन्हा नोंदवला, दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दोन्ही आरोपी मुलांना कोर्टात हजर करण्यात आलं.
हे ही वाचा-DCP पत्नीला पतीकडून मारहाण; डोकं भिंतीवर आपटलं अन्,महिलेने सांगितला भयंकर प्रकार
शेतात लाकडं तोडत होत्या मुली..
घटनेसंबंधित सोमवारी सायंकाळी पीडितेच्या आजीने पोलिसात तक्रार नोंदवली. 6 मित्रांनी सायंकाळी साधारण 5 ते 6 दरम्यान एके ठिकाणी बसून मोबाइलवपर पॉर्न पाहिलं. यानंतर त्यांनी तसच कृत्य करण्याचं ठरवलं. ते गावापासून लांब शेतात गेले. येथे दोन मुली लाकडं तोडत होती. त्यांनी मुलींना उचललं आणि एक एक करून मुलींवर बलात्कार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Gang Rape