मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /15 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी फसला प्रेमाच्या जाळ्यात; प्रेयसीमुळेच बिंग फुटलं

15 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी फसला प्रेमाच्या जाळ्यात; प्रेयसीमुळेच बिंग फुटलं

गेल्या 15 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या युवकाला प्रेम (Accused trapped in love) करणं चांगलचं महागात पडलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडला फोन (Called his Girlfriend) केल्यामुळे पोलिसांनी अट्टल आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गेल्या 15 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या युवकाला प्रेम (Accused trapped in love) करणं चांगलचं महागात पडलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडला फोन (Called his Girlfriend) केल्यामुळे पोलिसांनी अट्टल आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गेल्या 15 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या युवकाला प्रेम (Accused trapped in love) करणं चांगलचं महागात पडलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडला फोन (Called his Girlfriend) केल्यामुळे पोलिसांनी अट्टल आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कानपूर, 17 मार्च: गेल्या 15 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या युवकाला प्रेम (Accused trapped in love) करणं चांगलचं महागात पडलं आहे. आपल्या गर्लफ्रेन्डला फोन (Called his Girlfriend) केल्यामुळे पोलिसांनी अट्टल आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आरोपीवर 1 लाख रुपयांचं बक्षिसही जाहीर करण्यात आलं होतं. पण हा आरोपी कोणाच्याही जाळ्यात अडकत नव्हता, पण प्रेमाने त्याचा घात केला आहे. संबंधित अटक केलेल्या व्यक्तीचं नाव रवि सोनी उर्फ विक्की सोनी (Accused Vicky Soni) असं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस या आरोपीच्या मागावर होते. पण त्याचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता. त्यानंतर अलीकडेच पोलिसांना आरोपीच्या प्रेयसीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक (Arrest) केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आहे. गेल्या दीड वर्षांपासून हा आरोपी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्ससाठी डोकेदुखी बनला होता. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आरोपी विक्की मोबाईलचा वापर करत नव्हता. त्यामुळे त्याला पकडणं अवघड जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडबाबत माहिती मिळाली. त्यानंतर एसटीएफने संबंधित युवतीचा फोन नंबर सर्विलन्सवर ठेवला. त्यानंतर तिला आरोपी व्यक्तीचा फोन आला आणि पोलिसांना आरोपीच्या ठिकाणाचा सुगावा लागला. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

2019 मध्ये सुनावणी दरम्यान झाला होता फरार

खरं तर, 3 ऑक्टोबर 2019 रोजी विक्की न्यायालयात सुनावणीसाठी हजर होता. यावेळी त्याने पोलिसांना चकमा देऊन पळ काढला होता. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून आरोपी विक्की 30 ते 40 वेळा कानपूरला येऊन गेला. पण पोलिसांना आणि एसटीएफला त्याचा काही सुगावा लागला नाही. मात्र एसटीएफला त्याच्या गर्लफ्रेंडची माहिती मिळाल्यानंतर त्याची उचलबांगडी करण्यात आली आहे.

(वाचा -मंदिर परिसरातच साधूची धारदार कुऱ्हाडीनं हत्या; भयंकर घटनेमुळे खळबळ)

आरोपी विक्कीने त्याच्या प्रियसीला वेगवेगळ्या नंबरवरून 15 वेळा फोन केला होता. यानंतर त्याने प्रेयसीला जेव्हा सोळाव्या वेळी कॉल केला, तेव्हा त्याचा नंबर ट्रेस करण्यात पोलिसांना यश आलं. यानंतर एसटीएफने कारवाई करत आरोपीला पकडलं आहे. कारवाई दरम्यान आरोपी विक्कीला दुखापत देखील झाली आहे. कानपूरमध्ये 2015 साली झालेल्या सनसनाटी खूनाच्या (Main accused in murder) घटनेत विक्की हा मुख्य आरोपी होता.

First published:

Tags: Crime, Love story, Murder, Uttar pardesh