19 जून : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाडची कळंबा कारागृहामधून सुटका झालीय.
शनिवारी कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याची आज संध्याकाळी सुटका करण्यात आलीये. गेल्या 21 महिन्यांपासून समीर कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये होता. समीरला आता जामीन मिळालाय. खटल्यातूनही तो निर्दोष मुक्त होईल असा विश्वास त्याच्या वकिलांनी व्यक्त केलाय.
आज त्याच्या सुटकेची बातमी समजताच जेलच्या परिसरात हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पण त्याच गर्दीतून त्याचे दोन्ही वकील म्हणजेच समीर पटवर्धन आणि विरेंद्र इचलकरंजीकर यांनी आणि सनातनच्या कार्यकर्त्यांनी त्याला गाडीत बसवून तात्काळ जेलच्या परिसरातून बाहेर काढलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा