PMC बँक घोटाळ्यासंबंधी मोठी हालचाल, राज ठाकरे काढणार तोडगा?

PMC बँक घोटाळ्यासंबंधी मोठी हालचाल, राज ठाकरे काढणार तोडगा?

आज पीएमसी खातेधरकांना नेमका राज ठाकरे काय दिलासा देतात, हे पाहावं लागेल.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : सप्टेंबर महिन्यात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले. त्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे पीएमसी बँकेचे खातेदार आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. गुरुवारी मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पीएमसी बँकेच्या गैर व्यवहारावर भाष्य केलं होतं. आणि सरकारवर आरोपही केला की या सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून 1 लाख 70 हजार कोटी सरकार चालवण्यासाठी काढले. या सगळ्यावर आता खातेदार हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता पीएमसीच्या या घोळावर तोडगा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बँका बचवजण्यासाठी रिजर्व बँकेत असलेले पैसे वापरले तर बँकांचे काय होणार? असा सवालही उपास्थित केला जातोय. या पार्श्वभूमीवर आज पीएमसी खातेधरकांना नेमका राज ठाकरे काय दिलासा देतात, हे पाहावं लागेल. दरम्यान, गुरुवारी मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. सप्टेंबर महिन्यात या बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले. त्यामुळं खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

इतर बातम्या - रस्ता नाही यमदेव! खड्डा चुकवताच ट्रकने चिरडलं, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन भाजप कार्यालयात दाखल होताचं पीएमसीच्या संतप्त खातेदारांनी एकचं गोंधळ घातला. तिथे असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र खातेदारांनी त्यांना न जुमानता जोरदार घोषणाबजी केली. तसेच आपल्या खात्यातील पैस परत करण्याची मागणी अर्थमंत्र्यांकडं केली. बँक खातेदारांच्या या गनिमीकाव्यामुळे भाजप कार्यालयात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

इतर बातम्या - PMC बँक धारकांचा मुख्यमंत्र्यांना घेराव, पैसे परत करण्याची मागणी

या गोंधळानंतर अर्थमंत्री सीतारमन यांनी पीएमसीच्या खातदारांशी या विषयी चर्चा केली. तसेच या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं सांगीतलं. वेळप्रसंगी हिवाळी अधिवेशनात यासाठी विधेयक आणण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलं.

सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले.त्यामुळं बँकेला नवी कर्ज देण्यावर मर्यादा आल्या. तसेच ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध आले. बँक खात्यातून पैसे काढण्यावरही बंधनं आले. त्यामुळं खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. आपल्या कष्टाची रक्कम बुडणार तर नाही ना? अशी शंका खातेदारांच्या मनात घर करुन आहे.आता अर्थमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं असलं तरी प्रत्यक्षात खातेदरांना कधी दिलासा मिळणार हाच खरा प्रश्न आहे. इतर बातम्या -

इतर बातम्या - नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी सुरू असताना निघाली घोरपड, या नेत्याने दिले जिवदान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 08:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading