रामानेच सीतेचं अपहरण केलं होतं, गुजरातमध्ये बारावीच्या पुस्तकात घोडचूक

रामानेच सीतेचं अपहरण केलं होतं, गुजरातमध्ये बारावीच्या पुस्तकात घोडचूक

  • Share this:

गुजरात, 01 जून : रामानेच सितेचं अपहरण केलं होतं असा अजब दावाच गुजरातमध्ये बारावीच्या इंट्रोडक्शन टू संस्कृत लिटरेचरमध्ये करण्यात आलाय. गुजरात राज्य मंडळाच्या शालेय पुस्तक (GSBST) ने हा घोळ केला असून यावर वाद पेटला आहे.

बारावीच्या या पुस्तकात कालीदास यांची कविता रघुवंशम ची व्याख्या चुकीच्या पद्धतीने छापण्यात आलीये.  पेज क्रमांक 106 मध्ये लिहिलंय की, "कवीने आपले मौलिक विचारातून राम चरीत्र उलगडले आहे. रामाकडून सितेचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर लक्ष्मणाकडून रामाला दिलेला संदेश मन हेलावून टाकणार आहे असं वर्णन करण्यात आलंय."

पुस्तकात या उल्लेखामुळे लोकांना जोरदार आक्षेप घेतलाय. पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या टीमने चुकीचं भाषांतर केल्यामुळे हा घोळ झाल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं.

GSBST चे चेअऱमन डॉ. नितीन पेठानी यांनी ही चूक स्वीकारली. आमच्या टीमकडून abducted शब्दाचा चुकीचा अर्थ काढला. भाषांतर करणाऱ्या टीमनेही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जसेच्या तसे छापलं गेलं. या प्रकरणी संबंधीतांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.

तर गुजरातचे काँग्रेसचे प्रवक्ते डाॅ.मनिष दोशी यांनी गुजरात मंडळाकडून अशा चुका वारंवार होतात. प्रत्येक वर्षी अशा चुका मंडळाकडून होत आहे. अशी चूक करून मंडळाने रामाचा अपमान केलाय अशी टीका दोशींनी केली.

First published: June 1, 2018, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading