Home /News /news /

काय सांगता? भारत पेट्रोलियम खरेदी करण्याच्या शर्यतीत जागतिक स्तरावरच्या तेल कंपन्यांमध्ये चढाओढ?

काय सांगता? भारत पेट्रोलियम खरेदी करण्याच्या शर्यतीत जागतिक स्तरावरच्या तेल कंपन्यांमध्ये चढाओढ?

ही भारतातली तिसरी सर्वांत मोठी तेल रिफायनरी (Oil Refiner) आणि दुसरी सर्वांत मोठी किरकोळ इंधन विक्रेती कंपनी आहे.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट :  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ही सरकारी कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत जागतिक स्तरावरच्या तेल कंपन्या (Oil Industries) इन्व्हेस्टमेंट फंडाशी (Investment Fund) हातमिळवणी करू शकतात, असं काही कागदपत्रांवरून स्पष्ट झालं आहे. या शर्यतीत रिलायन्स आणि अदानी समूह सहभागी होण्याची शक्यता नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे मध्य-पूर्वेतले तेल उत्पादक आणि एका रशियन कंपनीनेदेखील याकरिता बोली लावली नसल्याचं सांगितलं जात आहे. अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदान्ता समूहासह (Vedanta Group) अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वेअर्ड कॅपिटल या दोन अमेरिकी फंडांनी मागील वर्षी बीपीसीएलमधला सरकारचा संपूर्ण म्हणजेच 52.98 टक्के हिस्सा खरेदी करण्याबाबत प्राथमिक स्वरूपाची बोलणी केली होती. बीपीसीएल ही भारतातली तिसरी सर्वांत मोठी तेल रिफायनरी (Oil Refiner) आणि दुसरी सर्वांत मोठी किरकोळ इंधन विक्रेती कंपनी आहे. `बीपीसीएल निर्गुंतवणुकीबाबत संक्षिप्त सूचना` या सौद्यातल्या पुढील टप्प्यानुसार, व्यवहार सल्लागार आणि मालमत्ता मूल्यमापकाला आस्थापना अहवाल सादर करावा लागेल, बोली लावणाऱ्या कंपनीला आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागेल. तसंच खरेदी-विक्री कराराला अंतिम स्वरूप द्यावं लागेल, असं बीपीसीएल निर्गुंतवणुकीबाबतच्या संक्षिप्त सूचनेत म्हटलं आहे. या व्यतिरिक्त कन्सॉर्शियम (Consortium) तयार होत असल्यामुळे बोलीदारांकडून सुरक्षा मंजुरी आवश्यक असू शकते, असं अधिक तपशील न देता या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. इतर इच्छुक घटकांना बोली प्रक्रियेत भाग घेण्याची आणि एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर केलेल्या कोणत्याही बोलीदारासह एकसंघ तयारी करण्याची परवानगी असेल. हे वाचा - ग्रामीण भागातील युवकांसाठी मोठी संधी; या योजनेतून सुरु करु शकता व्यवसाय अंबानी आणि गौतम अदानी शर्यतीत नाहीत भारतीय अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह रॉयल डच शेल, बीपी आणि एक्सॉन सारख्या जागतिक तेल कंपन्यांनी 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत असलेल्या मुदतीत बीपीसीएल अधिग्रहणासाठी कोणताही EOI दाखल केलेला नाही. मध्य-पूर्वेतले तेल उत्पादक आणि रशियाच्या रोझनेफ्टला बीपीसीएलमध्ये स्वारस्य असल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यांनी कोणतीही बोली सादर केलेली नाही. उद्योगजगतातल्या सूत्रांनी याबाबत सांगितलं, की मध्य-पूर्वेतला एक प्रमुख जागतिक तेल उत्पादक यापूर्वीच शर्यतीत असलेल्या गुंतवणूक फंडासोबत अधिक जवळून काम करत असणं शक्य आहे. अंबानी यांची रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अदानी समूह (Adani Group) या शर्यतीत सहभागी होण्याची शक्यता नसल्याचं एका सूत्रानं सांगितलं.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या