तो प्रवास ठरला अखेरचा, 4 चिमुरड्यांसह 7 भाविकांचा जागीच मृत्यू

तुळजापूर-सोलापूर मार्गावर अतिवेगात जाणाऱ्या टँकर चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा जीवघेणा अपघात घडला.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 10:17 PM IST

तो प्रवास ठरला अखेरचा, 4 चिमुरड्यांसह 7 भाविकांचा जागीच मृत्यू

बालाजी निरफळ, प्रतिनिधी

उस्मानाबाद, 18 फेब्रुवारी : उस्मानाबादच्या तुळजापूर-सोलापूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  7 जण ठार तर 4 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मळीचा टँकर आणि ओमीनी कारच भीषण अपघात झाला. तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या ओमीनी कारचा अपघात झाला ज्यात एकाच कुटुंबतील 7 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

सोमवारी सांयकाळच्या सुमारास हा अपघात घडला आहे. तुळजापूर-सोलापूर मार्गावर अतिवेगात जाणाऱ्या टँकर चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा जीवघेणा अपघात घडला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये 4 लहान मुलं, 2 महिला 1 पुरुषाचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अपघात घडताच टँकर चालकर फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोलापूर वरून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक निघाले असता अपघात झाल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'

Loading...

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं

- रजनी प्रेमकुमार चिलधरे, वय ३५ वर्ष

- शिवकुमार गोविंद पोवत्ते, वय ४० वर्ष

- नर्मदा शिवकुमार पोवत्ते, ३५ वर्ष

- नेताजी शिवकुमार पोवत्ते, १२ वर्ष

- श्रध्दा शिवकुमार पोवत्ते वय, ४ वर्ष

- अर्पवा प्रेम कुमार चिलवरे, १३ वर्ष

- वर्षा लिंबराज अडम १२ वर्ष अशा सात जणांचा मुत्यू झाला आहे.

शहीद जवानाच्या दीड वर्षाच्या मुलाने विचारलं, "गप्प बस आई, तू का इतकी रडतेस"

अपघातात जखमींची नावं

- नागेश कॅनम, वय ३२

- मयुरी नागेश कॅनम, वय २५

- ऋतिका शिवकुमार पोवत्ते, वय १५

- श्रावणी भालचंद्र महुत, वय 8 वर्ष यांना शासकिय रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी अपघात स्थळावरून 7 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातासंदर्भात मृतांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी टँकर चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे. तर यात सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार आहे. तर एकाच कुटुंबातील 7 जणांनी अपघातात प्राण गमावल्याने संपूर्ण कुटुंबार दुखाचा डोंगर कोसळला आहे तर गावात


VIDEO : ओव्हरहेड वायरला हात लावून 'तो' आत्महत्या करणार होता, पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...