सुजय विखेंना सुरक्षा देणाऱ्या पोलीस वाहनाचा भीषण अपघात, 150 फूट दरीत कोसळली कार

अहमजनगर-पारनेर तालुक्यात गारखिंड घाटात 150 फूट दरीत पोलिसांची गाडी कोसळली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 05:05 PM IST

सुजय विखेंना सुरक्षा देणाऱ्या पोलीस वाहनाचा भीषण अपघात, 150 फूट दरीत कोसळली कार

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमजनगर, 06 नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे यांना सुरक्षा देणार्‍या पोलीस वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. पारनेर तालुक्यातील गारखिंड घाटात गाडीला अपघात झाला आहे. अहमजनगर-पारनेर तालुक्यात गारखिंड घाटात 150 फूट दरीत पोलिसांची गाडी कोसळली असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांच्या या वाहनामध्ये 4 जण असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सहाय्यक निरीक्षक बालाजी पदमने यांच्यासह इतर 3 पोलीस आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणीसाठी पारनेर दौर्‍यावर आले होते. भाळवणी, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या आणि मांडओहोळचा धरण दौरा आटोपून पिंपळगाव रोठाजवळ असणार्‍या गारखिंड घाटात या वाहनाचा रॉड तुटल्याने गाडी 150 ते 200 फुट खोल दरीत कोसळली.

या भीषण अपघातामध्ये सहाय्यक निरीक्षक बालाजी पदमने यांच्यासह इतर 3 पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

इतर बातम्या - 45 वर्षाच्या भाजप नेत्याचं तिसरं लग्न, 18 वर्ष लहान तरुणीशी केला विवाह

Loading...

दरम्यान, राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचा थैमान तर दुसरीकडे सत्तासंघर्ष अशी परिस्थिती आहे. या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विशेष टिपण्णी केली आहे. ज्यातल्या राजकीय परिस्थितीवर बोलण्यासारख काही नाही अशी मिश्किल टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. जनतेने युतीला कौल दिला आहे त्यामुळे भाजप -शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि राज्यातील अस्थैर्य दूर करावे, असे पवारांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बसणार असल्याचे पवारांनी सांगितले. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू असे देखील पवार म्हणाले.

इतर बातम्या- 'सरसकट कर्जमाफी, सरसकट ओला दुष्काळ आणि सरसकट पवार हे राज्याचे मुख्यमंत्री'

आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. त्याच बरोबर सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोनवरून चर्चा केली होती. सकाळपासूनच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. संजय राऊत यांच्या भेटीबद्दल बोलताना पवारांनी सांगितले की, राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. राज्यसभेच्या आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा झाली. तसेच आज सकाळी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या भेटीसंदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा असे पवार म्हणाले. पण गडकरी यांची भेट ही रस्ते आणि विकासासाठी असते असेही पवार म्हणाले.

इतर बातम्या - Facebook वर झालेल्या वादात दोन भावांना चाकूने भोसकलं, एकाचा मृत्यू तर दुसरा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...