मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /अन् ती काळरात्र ठरली; भरधाव ट्रेलरखाली चिरडून 3 जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO समोर

अन् ती काळरात्र ठरली; भरधाव ट्रेलरखाली चिरडून 3 जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO समोर

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दिल्ली-जयपूर बायपास मार्गावरील ब्रह्मपुरी परिसरात धोबी घाट रोडवर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दिल्ली-जयपूर बायपास मार्गावरील ब्रह्मपुरी परिसरात धोबी घाट रोडवर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दिल्ली-जयपूर बायपास मार्गावरील ब्रह्मपुरी परिसरात धोबी घाट रोडवर झाला.

जयपूर, 06 जानेवारी : अहमदाबाद-मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्यानंतर आणखीन एक भीषण अपघात समोर आला आहे. जयपूर-दिल्ली बायपास मार्गावर भरधाव ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रेलरनं बाइकला देखील धडक दिली. या अपघातात तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दिल्ली-जयपूर बायपास मार्गावरील ब्रह्मपुरी परिसरात धोबी घाट रोडवर झाला. बंगाली बाबा आश्रमाजवळ असलेल्या सर्कलपाशी हा अपघात झाला आहे. या अपघाताची दृश्य तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मिळलेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेलरला हा भीषण अपघात झाला आहे.

हे वाचा-धक्कादायक, पोलीस स्टेशनच्या आवारातच गळफास घेऊन एकाची आत्महत्या

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की ट्रेलर जात असताना उलटला आहे. ओव्हर लोडमुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर या ट्रेलरजवळून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघातात ट्रेलरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तांदूळाची पोती हटवली आणि मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आले आहेत.

First published:

Tags: Road accident