News18 Lokmat

चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅव्हल्स आणि रेतीच्या ट्रकचा भीषण अपघात; 4 जण ठार, 7 जखमी

भरधाव वेगाने जाणारी ट्रॅव्हल्स ही नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 07:36 AM IST

चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅव्हल्स आणि रेतीच्या ट्रकचा भीषण अपघात; 4 जण ठार, 7 जखमी

नागपूर, 08 जुलै : पावसाळा असल्यामुळे रस्त्यांवर अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरात भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची रेतीच्या ट्रकला जोरदार धडक झाली आणि यामध्ये 4 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्री 9च्या सुमारास हा अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भरधाव वेगाने जाणारी ट्रॅव्हल्स ही नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पावासामुळे आधीच सर्व रस्ते ओले झाले आहेत. त्यामुळे चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स थेट रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या अपघातामध्ये ट्रॅव्हल्समध्ये असलेले 7 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 5 जणांवर नजिकच्या ट्रॅामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर इतर जणांचाही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पावसाळ्यामध्ये वाहनं सावकाश चालवा अशा वारंवार सुचना दिल्यानंतरही गांड्याचा वेग काही कमी होत नाही. त्यामुळे अशा नाहक बळी जातात. स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नागपूर पोलिसांनी अपघाती वाहनं रस्त्याच्या बाजूला करत 4 मृतदेह घटनास्थळवारून ताब्यात घेतली आहेत. त्यांना शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Loading...

VIDEO: हॉलीवुड सिनेमा पाहून कोटक महिंद्रा बँकेमध्ये दरोडा, चोरट्यांचा राडा CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2019 07:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...