Home /News /news /

मुंबईत भीषण अपघात, सांताक्रूझ लिंक रोडवर बसने 3 गाड्यांनी दिली जोरदार धडक

मुंबईत भीषण अपघात, सांताक्रूझ लिंक रोडवर बसने 3 गाड्यांनी दिली जोरदार धडक

या अपघातात एक वाहनचालक गंभीर जखमी झाला असून 3 वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

    मनोज कुळकर्णी, मुंबई, 21 ऑक्टोबर : मुंबईतील चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर बसने रात्री 5 वाहनांना धडक दिली. या अपघातात एक वाहनचालक गंभीर जखमी झाला असून 3 वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईत संध्याकाळी अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. यामुळे रस्ते ओले झाले होते. त्यावेळी चेंबूर सांताक्रूझ लिंक रोडवर एक दुचाकीस्वार पुलावर जाऊन संरक्षक कठड्यावर धडकला. यामुळे येणारी वाहने या मोटारसायकल स्वाराला मदत करण्यासाठी थांबली, मात्र त्याचवेळी मागून वेगात येणाऱ्या बसने 3 कारला जोरदार धडक दिली. हेही वाचा - ड्रग्ज धंद्याविरोधात लढणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर CCTV मध्ये झाले कैद या अपघातात फॉरचूनर,स्विफ्ट डिझायर आणि व्हॅगणार या कारचं नुकसान झालं. व्हॅगणार या कारचं नुकसान तर झालंच, पण त्याचा चालकही गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं आहे. अपघाग्रस्त फॉरचूनर गाडीवर मनसेचा झेंडा लावला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या गाडीत मनसेचा पदाधिकारी असण्याची शक्यता आहे. मात्र गाडीत नेमकं कोण होतं, याबाबतची नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अपघातातील कार चालकाने दिलेल्या माहितीनुसार बस विमानतळाकडे जात होती, त्यात सीआयएसएफचे जवान बसले होते. आधी सीआयएसएफच्या बस चालकाने ब्रेक फेल झाले असे सांगितले आणि नंतर आम्ही देशाची सेवा करतो असे सांगून तेथून निघून गेले. दरम्यान, नेहरू नगर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी अपघातग्रस्त गाड्या पोलीस स्टेशनला नेल्या. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या