मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली घाटात भीषण अपघात, 2 कंटेनर 100 फूट खोल दरीत कोसळले

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली घाटात भीषण अपघात, 2 कंटेनर 100 फूट खोल दरीत कोसळले

 
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबई लेनवर हा अपघात झाला असून अजून काही जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबई लेनवर हा अपघात झाला असून अजून काही जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबई लेनवर हा अपघात झाला असून अजून काही जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  sachin Salve

प्रमोद पाटील, प्रतिनिधी

खोपोली, 30 नोव्हेंबर : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला आहे. खोपोली घाटात दोन कंटेनर शंभर फूट खाली कोसळले आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे. या अपघातात काहीजण जखमी आहेत. अग्निशमन दलाच्या जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबई लेनवर हा अपघात झाला असून अजून काही जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गाड्यांची एकमेकांची ठोकर लागल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितलं जात आहे. यातील एक कंटेनर सामानाने भरलेला होता. आतापर्यंत एक मृतदेह सापडला असून आणखी यात अडकलेले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

(पुणे पुन्हा हादरलं; 48 वाहनांच्या अपघातानंतर नवले पुलावर पुन्हा ट्रकची धडक)

शंभर फूट खाली गेलेल्या दोन्ही गाड्यांना आणि त्यातील काही अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पहाटे चार ते साडेचार वाजता हा अपघात झाला असून दरी खूप खोल असल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. पोलीस घटनास्थळी असून पुढील घटनेचा तपशील काही वेळात करणार आहेत.

शेती काम करताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

(Video : पुण्यातील नवले पुल का झालाय मृत्यूचा सापळा? स्थानिकांनी सांगितलं महत्त्वाचं कारण)

रोटाव्हेटरमध्ये अडकून सुरज भवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नांदुरढोक शिवारात घडली. भवार हा शेतात रात्री ट्रॅक्टरने रोटाव्हेटर मारत होता. त्यावेळी रात्री रोटाव्हेटरची सेंटिंग करत असताना रोटाव्हेटरमध्ये अडकून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

First published:

Tags: Marathi news, Mumbai pune expressway