आग्रा-मुंबई हायवेवर गाड्यांचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

आग्रा-मुंबई हायवेवर गाड्यांचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

  • Share this:

धार (मध्य प्रदेश), 28 ऑक्टोबर : राऊ-खलघाट फोलरेन इथल्या गणपती घाट इथे सोमवारी सायंकाळी मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे घाटावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 5 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. ऐन दिवाळीच्या उत्सवात अपघात झाल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

भर रस्त्यात धावणाऱ्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे मागे असणाऱ्या अनेक गाड्यांचाही यात अपघात झाला आहे. या अपघातामुळे धामनोद पोलीस स्टेशन परिसरात गणेश घाटातील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. येथे एका ट्रॉलीने जवळपास 2 ते 3 गाड्यांना जोरात धडक दिली. या धडकेत सुमारे 10 ते 12 जण जखमी झाले आहेत, तर पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या - दोन मित्रांची दिवाळी ठरली अखेरची, शेततळ्यात बुडून 16 वर्षीय मुलांचा मृत्यू

इतर बातम्या - दिवाळीला गालबोट, Happy Diwali म्हटला म्हणून तरुणाची तलवारीने हत्या

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गणपती घाटातून गाडी सुमारे दोन किमीपर्यंत घासत गेली आणि पुढे असलेल्या ढाब्याजवळ थांबली. यामध्ये 4 वाहनांची टक्कर झाल्याचंही सांगण्यात येत आहे. काही कारस्वार अद्याप जागीच अडकले आहेत तर यात दोन मुले गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

इतर बातम्या - दिवाळीला गालबोट, Happy Diwali म्हटला म्हणून तरुणाची तलवारीने हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या