अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंड अबू इस्माईलचा खात्मा

abu-ismail-killed-in-nowgam

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2017 05:52 PM IST

अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंड अबू इस्माईलचा खात्मा

14 सप्टेंबर : अमरनाथ यात्रेवर भ्याड हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाचा  मास्टरमाईंट अबू इस्माईलला ठार मारण्यात आलंय.श्रीनगरमध्ये भारतीय सुरक्षादलांनी केलेल्या एनकाऊंटरमध्ये अबू इस्माईलचा खात्मा झालाय.

10 जुलै 2017 रोजी काश्मिर खोऱ्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 7 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.  या हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा आणि हिजुबल मुजाहिद्दीन या दोन संघटनांचाच हात होता. या हल्ल्याचा कट  अबू मोहम्मद इस्माईल  या अतिरेक्याने हिजबुलच्या मदतीने हा हल्ला घडवला होता.

आज श्रीनगरमधील नौगाम भागात सुरक्षादलांनी केलेल्या एनकाऊंटरमध्ये अबू इस्माईलला ठार मारण्यात आलंय. त्याच्यासोबत आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...