उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन बाबरी मशीद बांधणार, अबू आझमींच्या मुलाची वादग्रस्त टीका

उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन बाबरी मशीद बांधणार, अबू आझमींच्या मुलाची वादग्रस्त टीका

मुख्यमंत्री 100 दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री 100 दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत.

फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. फरहान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

'सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निराश'

27 जानेवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात मुंबईत झालेल्या मोर्चाला संबोधित करताना फरहान आझमी म्हणाले की, 'उद्धव ठाकरे अयोध्येत जात असतील तर मीसुद्धा जाईल. आम्ही सर्व जाऊ. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आमंत्रित करेन. माझे वडीलही जातील. उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्यासाठी जातील, पण आम्ही बाबरी मशीद बांधायला जाऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहोत.'

फरहान आझमी म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्याला जाण्याचा निर्णय मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जगभरात 2.5 अरब लोकसंख्या आहे. त्यामद्ये 50 पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशाला आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही'

इतर बातम्या - गांधींच्या हत्येचा तो गुन्हेगार ज्याला गोडसेंसोबत झाली होती फाशी

'उद्धव ठाकरेंनी सोडला भाजपचा हात'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत फरहान आझमी म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नरेंद्र मोदींच्या नावावर मते मिळाली. आता त्यांना सोडून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मी सांगतो की त्यांचे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. त्यांनी आतापासूनच नोटाला मत देण्यास सांगितले. इतकंच नाही तर संपूर्ण शिवसेनेमध्ये जर कोणी लायक असेल तर ते फक्त उद्धव ठाकरे आहे असं खळबळजनक वक्तव्य फरहान आझमी यांनी केलं आहे.

फरहान आझमी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले की, त्यांनी दिलेलं विधान म्हणजे त्यांची मते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच ते अयोध्येत जात आहेत.

First published: January 30, 2020, 12:21 PM IST

ताज्या बातम्या