मुंबईकरांनो सावधान, रस्त्यावर आहे 50पेक्षा अधिक मृत्यूचे सापळे!

एल्फिस्टन परिसरातील नागरिकांनी मॅनहोलचं झाकणं बाजूला केलं. त्यात पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. एका मॅनहोलचं झाकणं उघडण्याने इतका मोठा अनर्थ घडला तर विचार करा जेव्हा सगळ्या रस्त्यावरच्या मॅनहोल उघडे पडले तर काय होईल?

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 01:45 PM IST

मुंबईकरांनो सावधान, रस्त्यावर आहे 50पेक्षा अधिक मृत्यूचे सापळे!

प्रणाली कापसे, प्रतिनिधी

मुंबई, 09 जुलै : दोन वर्षापूर्वी पावसाचं पाणी घरात शिरू नये म्हणून एल्फिस्टन परिसरातील नागरिकांनी मॅनहोलचं झाकणं बाजूला केलं. त्यात पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. एका मॅनहोलचं  झाकणं उघडण्याने इतका मोठा अनर्थ घडला तर विचार करा जेव्हा सगळ्या रस्त्यावरच्या मॅनहोल उघडे पडले तर काय होईल? त्यामुळे मुंबईकरांनो तुमच्या जीवाला रस्त्यांवरून चालतानाही धोका आहे.

मुंबईच्या कुर्ला ते सायन या परिसरातील लाल बहाद्दूर शास्त्री रस्त्यावरची मॅनहोलची झाकणं ही वजनाला हलकी असल्याने ऐन पावसात पाण्याच्या दबावामुळे मॅनहोलच्या बाजूला पडतात. त्यामुळे मॅनहोल उघडी पडतात. लोखंडी झाकणं चोरीला जात असल्याने बीएमसीने संपूर्ण एलबीएस रोडला एफआरपीची झाकणं बसवून घेतली आहेत. पण त्यातली 50हुन अधिक झाकणं ही मिठी लगतच्या पट्याच्या जवळ येतात.

एकीकडे कोठीची पातळी आणि दुसरीकडे आभाळातून पडणाऱ्या पावसाचा दाब यामुळे ही हलकी झाकणं निघून जातात आणि तयार होतात ते मृत्यूचे सापळे. स्थानिक नगरसेविका सईदा खान यांनी याबाबत महापालिकेला पत्र लिहिले असून ताबडतोब ही झाकणं बदलण्यात यावी अशी मागणी केली आहे.

या मागणीवर पालिका अंमलबजावणी कधी करणार याचं काही सांगता येत नाही. पण मुंबईकरांनो, तोपर्यंत तुमची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. रस्त्यांवर चालताना कुठे खड्डे किंवा गटारं उघडी तर नाहीत ना याची नक्की काळजी घ्या.

Loading...

येत्या 24 तासांत मुंबईत होणार अतिवृष्टी

आज म्हणजेच मंगळवारी मुंबईवर अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईकरासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 200 मिली पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. आज ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार आहे. त्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे पोलिसांनी मुंबईकरांना शक्य असेल तरच घराबाहेर पडा अशा सुचना केल्या आहेत.

इतर बातम्या : वहिनीच्या प्रेमात पडलेल्या दिराने सख्या भावाचाच काढला काटा!

मुंबई आणि पुण्याला जोडणारा सायन-पनवेल हा महामार्ग काल अक्षरश पाण्याखाली गेला होता. खारघर येथील पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्यानं सायन-पनवेल महामार्गाला नदीचं स्वरुप आलं. आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा पाण्यानं नागरिकांची वाट अडवल्यानं प्रशासनाचं पितळ उघडं पडलं आहे.

सोमवारी झालेल्या पावासमुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये खूप पाणी साचलं होतं. रेल्वे स्थानकांत पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे धिम्यागतीने सुरू होती. आजही मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडताना तुमच्या शहरातील पावसाचा अंदाज नक्की घ्या.

VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...