मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुणेकरांचं आंदोलनंही अनोखं! बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्या शेजारी 100 जण जमले आणि...

पुणेकरांचं आंदोलनंही अनोखं! बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्या शेजारी 100 जण जमले आणि...

जुन्नरमध्ये माणसांवर आणि प्राण्यांवर वारंवार होणारे हल्ले आणि यामुळे निर्माण झालेला मानव-बिबट संघर्ष खूप जुना आहे. मात्र यावर कोणतीही उपाय योजना होताना दिसत नाहीये.

जुन्नरमध्ये माणसांवर आणि प्राण्यांवर वारंवार होणारे हल्ले आणि यामुळे निर्माण झालेला मानव-बिबट संघर्ष खूप जुना आहे. मात्र यावर कोणतीही उपाय योजना होताना दिसत नाहीये.

जुन्नरमध्ये माणसांवर आणि प्राण्यांवर वारंवार होणारे हल्ले आणि यामुळे निर्माण झालेला मानव-बिबट संघर्ष खूप जुना आहे. मात्र यावर कोणतीही उपाय योजना होताना दिसत नाहीये.

पुणे, 17 ऑगस्ट : राज्यातील सर्वाधिक बिबट्यांची संख्या कुठे आहे असा प्रश्न कुणी विचारला तर अर्थात नाव येत ते जुन्नरचं. जुन्नरमध्ये माणसांवर आणि प्राण्यांवर वारंवार होणारे हल्ले आणि यामुळे निर्माण झालेला मानव-बिबट संघर्ष खूप जुना आहे. मात्र यावर कोणतीही उपाय योजना होताना दिसत नाहीये. त्यामुशे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आजपासून एक अनोखं आंदोलन सुरू केलं आहे. बिबटे पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्या शेजारी तंबू लावून ग्राहक पंचायतीचे 100 आंदोलक आपल्या मागण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेत.

पाळीव प्राण्यांवर आणि माणसांवर हल्ले झाल्यावर वनविभाग जागा होतो आणि मग पिंजरे लावण्याचे सोपस्कार केले जातात. दरवर्षी हल्यात जखमी झालेल्या आणि मृत झालेल्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना आणि नातेवाईकांना वनविभाग करोडो रुपयांची मदत देते. इथल्या समस्या मात्र सुटत नाहीयेत. त्यामुळे नागरिकांनी थेट पिंजऱ्याच्या शेजारीच आंदोलनाला सुरूवात केली आहे.

मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

ग्राहक पंचायतीने वनविभाग आणि राज्य शासनाकडे काही मागण्या केल्यात त्या पाहुयात...

- ग्रामपंचायतीचे स्ट्रीट लाईट विनाअट बसवा तसेच बिबट व इतर जंगली श्वापदाचा वावर असलेल्या ठिकाणी वीज जोड प्राधान्याने द्या.

- शेतीपंपधारक प्रलंबित वीज कनेक्शन त्वरित द्या कृषीपंपाला किमान 12 तास वीज पुरवठा करा. - - - राज्यातील शेती पंप वीजग्राहकांचे विज बिल दुरुस्ती केल्यानंतर अचूक वीज बिलांच्या आधारे दंड/व्याज माफ व मुद्दल बिलाच्या 50% सवलत देणारी नवी कृषी संजीवनी योजना राबवा.

- घरगुती वीज ग्राहकांना ऊर्जामंत्री यांनी जाहीर केलेल्या दरमहा 100 युनिट च्या आतील ग्राहकांना मोफत वीज या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी.

पुरुषाही लाजवेल या महिलेने केलेलं काम, पुण्यात कोरोना मृतांसाठी मोलाचा उपक्रम

याबाबतचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव यांच्याकडे केली आहे. मात्र, राज्य शासन व महावितरण'कडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज सोमवार दि. 17 ऑगस्ट 2020 पासून राज्यव्यापी आंदोलन राजुरी येथील वन विभागातून सुरू केले आहे. ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी बिबट्या प्रवण क्षेत्रात बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याच्या जवळच राजुरी येथुन या बेमुदत उपोषण सुरू केलं.

Weather Alert: पुढचे 48 तास राज्यासाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिला इशारा

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बिबट्याचा वावर असलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केलेल्या पंचवीस गावांमधून वन विभागाने पिंजरे लावलेले आहेत त्या पिंजरा जवळ प्रत्येकी एक कार्यकर्ता याप्रमाणे कोपी करून दिवस-रात्र आंदोलन करणार आहेत. आंदोलक कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून आंदोलन करत आहेत.

सदर मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास व आंदोलन तीव्र झाल्यास या आंदोलनात बिबट्याच्या हल्ल्यात आंदोलनकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची व महावितरण कंपनीची राहील असा इशारा औटी यांनी दिला.

First published:

Tags: Corona, Pune, Pune news