Home /News /news /

फ्लॉप चित्रपटांना वैतागून Abhishek सोडणार होता bollywood; बिग बींमुळं करतोय काम

फ्लॉप चित्रपटांना वैतागून Abhishek सोडणार होता bollywood; बिग बींमुळं करतोय काम

बिग बींच्या या सल्ल्यामुळं बदललं अभिषेकचं आयुष्य; फ्लॉप चित्रपटांमुळं होता नैराश्येत

    मुंबई 12 एप्रिल: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्यानं आजवर रोमँटिक, अक्शन, सस्पेन्स, विनोदी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये त्यानं केलेल्या अभिनयाची देखील प्रचंड स्तुती केली गेली. परंतु अभिषेकच्या एकाही चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणता येईल असं यश तिकिटबारीवर मिळालेलं नाही. अन् ज्या चित्रपटांना यश मिळालं त्याचं श्रेय नेहमीच इतर कलाकारांना दिलं गेलं. त्यामुळं अभिषेकवर एक फ्लॉप अभिनेता म्हणून स्टँप लावला गेला. या स्टँपमुळं नैराश्येत जाऊन त्यानं बॉलिवूडमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बिग बींच्या (Amitabh Bachchan) या सल्ल्यामुळं तो अद्याप बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अभिषेक बच्चनचा द बिग बुल (The Big Bull) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अभिषेकनं बिग बींनी दिलेला तो सल्ला सांगितला. तो म्हणाला, “मी महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. त्यामुळं नेहमीच माझी तुलना वडिलांसोबत केली जाते. माझ्या यशाची तुलना कायम त्यांनी मिळवलेल्या यशाची केली जाते. लोक मला कायम फ्लॉप अभिनेता म्हणून चिडवायचे. अन् या सातत्यानं होणाऱ्या टीकेला वैतागून मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वडिलांनी मला रोखलं. म्हणून आज बॉलिवूडमध्ये काम करतोय.” काय म्हणाले होते बिग बी? अमिताभ यांनी अभिषेकला असा सल्ला दिला की, खूप विचार करून भूमिका निवड आणि तुझ्या  कामावर लक्ष केंद्रित कर. वडील अमिताभ बच्चन यांचा हाच सल्ला अभिषेकच्या हृदयात घर करून राहिला. यामुळेच त्याने बॉलिवूड सोडण्याची कल्पना आपल्या मनातून काढून टाकली. याचाच परिणाम म्हणजे अभिषेक बच्चन आता केवळ चित्रपटांतच नव्हे तर ओटीटीच्या व्यासपीठावरही स्वत:ला सिद्ध करून दाखवत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Abhishek Bachchan, Actor, Amitabh Bachchan, Bollywood, Bollywood News

    पुढील बातम्या