'चिंतन'चे अभिनंदन थोरात यांना 'अहमदनगर भूषण' पुरस्कार जाहीर

'चिंतन'चे अभिनंदन थोरात यांना 'अहमदनगर भूषण' पुरस्कार जाहीर

'चिंतन आदेश'चे संपादक आणि राजकीय विश्लेषक अभिनंदन थोरात यांना मानाचा "अहमदनगर भूषण" पुरस्कार जाहीर झाला आहे . सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मूळच्या नगरवासियांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

  • Share this:

24 नोव्हेंबर, अहमदनगर : 'चिंतन आदेश'चे संपादक आणि राजकीय विश्लेषक अभिनंदन थोरात यांना मानाचा "अहमदनगर भूषण" पुरस्कार जाहीर झाला आहे . सामाजिक, राजकीय  आणि सांस्कृतिक  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मूळच्या नगरवासियांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. अभिनंदन थोरात हे मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील असून ते आता पुण्यात राहतात . राज्य आणि राष्ट्रीय  पातळीवरील  माध्यम जनसंपर्क क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा उमठवलाय.

दै. तरुण भारतमध्ये काही काळ काम केल्यानंतर अभिनंदन थोरात यांनी  'चिंतन एसएमएस सेवा' करून राज्यभर स्वतःचा जनसंपर्क वाढवला.त्यांची ही "चिंतन वृत्तसेवा"  सर्वपक्षीय राजकीय नेते, पत्रकार  आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे . निवडणूकपूर्व राजकीय सर्वेक्षण क्षेत्रातही अभिनंदन थोरात यांनी नाव कमावलं आहे. दिल्लीतील अण्णा हजारेंचं उपोषण सोडवण्यात अभिनंदन थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

राजकीय क्षेत्र आणि माध्यम क्षेत्र यांच्यात एक संपर्क  दुवा म्हणून ते आजही महत्वाच्या भूमिका बजावतात . तसंच विविध वृतपत्रांमधूनही ते नियमित स्तंभलेखन करत असतात. आताही ते फेसबूकवरून पत्रकारितेतील  मान्यवरांची ओळख करून देणारं विशेष सदर चालवतात. विशेषतः राजकीय जनसंपर्कात अभिनंदन थोरात यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. त्यांच्या याच विशेष कामगिरीची दखल घेऊन त्यांना नगरवासियांनी यंदाचा अहमदनगर भूषण हा पुरस्कार घोषित केला आहे.

First published: November 24, 2017, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading