News18 Lokmat

अब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर, भाजपमधून होतोय विरोध

सिल्लोड विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 04:48 PM IST

अब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर, भाजपमधून होतोय विरोध

मुंबई, 26 जून- सिल्लोड विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांनी आज, बुधवारी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशात संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. लवकरच सत्तार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सत्तारांना भाजपमधून होतोय विरोध..

माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनीही विखेंची भेट घेतली होती. त्यामुळे सत्तार विखेंसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असेही महाजन त्यावेळी म्हणाले होते. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील, तो निर्णय आपल्याला मान्य असेल. त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले होते. परंतु,

अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातून बडतर्फ केलेले अब्दूल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आधी पुकारला होता बंड..

Loading...

अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकावले होते. पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाहीतर त्यांनी सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचीही भेट घेतली होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तार यांनी आता भाजपची वाट निवडली होती. परंतु त्यांना आता भाजपमधून विरोध होत आहे.

VIDEO: आधी शिवरायांची वेशभूषा, आता पोलिसांचा गणवेश; राष्ट्रवादीचा आमदार वादात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...