कर्जमाफी लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध, तुमचं नावं इथं पाहा !

कर्जमाफी लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध, तुमचं नावं इथं पाहा !

आपले सरकार या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

  • Share this:

18 आॅक्टोबर : राज्य सरकारचे अखेर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं वाटप आजपासून सुरू केलंय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणापत्र देऊन याचा शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी आपले सरकार या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या यादीत तुम्ही तुमचं नाव शोधू शकतात.

तुमचं नाव शोधण्यासाठी https://csmssy.in/Farmer/ या लिंकवर क्लिक करा.

22 सप्टेंबर 2017 पर्यंत  1,05,12,040 इतकी नोंदणी झाली आहे. तर

56,59,187 जणांची कर्जमाफी करण्यात आलीये.

तसंच १८००१०२५३११ हा संपर्क क्रमांक आणि csmssy.helpdesk@maharashtra.gov.in हा मेल आयडीही देण्यात आलाय.

Loading...

या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी १.४.२००९ नंतर पीक कर्ज आणि मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल आणि व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसंच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.

सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...