'आप'मध्ये असंतोष? आशुतोष यांचा राजीनामा केजरीवालांकडून नामंजूर

'आप'मध्ये असंतोष? आशुतोष यांचा राजीनामा केजरीवालांकडून नामंजूर

  • Share this:

नवी दिल्ली,ता.15 ऑगस्ट : आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते आशुतोष यांचा राजीनामा पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नामंजूर केलाय. तुमचा राजीनामा आम्ही कसा मंजूर करू शकतो? नाही, या जन्मात तरी ते शक्य नाही असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलंय. आशुतोष यांनी आज सकाळी ट्विटवरून पक्षाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. यावरून 'आप'मध्ये सर्वच काही अलबेल नसल्याचं स्पष्ट होतेय. राज्यसभेच्या जागेसाठी आपला विचार होईल अशी आशा आशुतोष यांना होती मात्र डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याचं बोललं जातंय.

पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने तरुण हतबल, ध्वजरोहणावेळीच अंगावर ओतलं रॉकेल

पत्रकारीतेचं क्षेत्र सोडून आशुतोष यांनी अण्णा आंदोलनानंतर आपमध्ये प्रवेश केला होता. राजकारणात चांगल्या लोकांनी आलं पाहिजे आणि राजकारण स्वच्छ केलं पाहिजे असं मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं. मात्र 'आप'मधल्या परिस्थितीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. बुधवारी सकाळी ट्विट करून त्यांनी घोषणा करताच आप मध्ये खळबळ उडाली.

पिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल

प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो. आप सोबतचा माझा प्रवास सुंदर आणि क्रांतिकारी होता. तोही आता संपतोय. मी पक्षाकडे माझा राजीनामा पाठवून देत आहे. तो त्यांनी स्वीकारावा अशी मी विनंती करतो. वयक्तिक कारणांमुळं मी राजीनामा देत आहे. मला कायम पाठिंबा देणाऱ्या पक्षकार्यकर्त्यांचे धन्यवाद असं ट्विट आशुतोष यांनी केलं होतं.

ऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'

तर आपमधल्या या घडामोडींवर पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी ट्विटरवरून टीका केलीय. आणखी एक नेत्याची कट कारस्थान करून राजकीय हत्या करण्यात आलीय. आत्ममग्न असलेल्या नेत्याला स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा. शिशुपालाचा गुन्हे मोजले जात आहेत असं ट्विट त्यांनी केलंय. या आधी प्रा. योगेंद्र यादव, कुमार विश्वास आणि आता आशुतोष आपमधून बाहेर पडल्याने आपच्या प्रतिमेला धक्का लागला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2018 04:50 PM IST

ताज्या बातम्या