नवी दिल्ली,ता,19 जून : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आज मागे घेतले. दिल्ली सरकारनं आज आयोजित केलेल्या बैठकींना वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिल्याने हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केली.
दिल्ली सरकारनं आज पर्यावरण, परिवहन, रेशन आणि वाहतूक विभागाशी संबंधित विविध बैठकांचं आयोजन केलं होतं. या बैठकांना अधिकारी हजर राहिल्यानं दिल्ली सरकार आणि अधिकाऱ्यांमधले मतभेद संपल्याचं बोललं जातं आहे.
राज्यपालांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि आणि त्यांचे काही मंत्री गेल्या आठवडाभरापासून ठिय्या देवून बसले होते. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी होती.
दिल्लीतले आयएएस अधिकारी संपावर आहेत ते सहकार्य करत नाही असा केजरीवाल यांचा मुख्य आरोप होता. अधिकारी असहकार्य करत नसल्यानं प्रशासनाचं कामकाज ठप्प झाल्याची तक्रारही केजरीवाल यांनी केली होती. अधिकाऱ्यांच्या या संपात तोडगा काढावा असं गाऱ्हानं घेवून केजरीवाल नायब राज्यपाल अनि बैजल यांची भेट घ्यायला गेले होते. मात्र त्यांनी भेट नाकारल्यानं केजरीवालांनी त्यांच्याच घरी मुक्काम ठोकला होता.
केजरीवालांच्या या होत्या मागण्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, Arvind kejriwal, Delhi, Manish sisodiya, Strike called off, अनिल बैजल, अरविंद केजरीवाल, आंदोलन, दिल्ली, मनिष सिसोदिया, संप