दिल्ली 'आप'चा मोर्चा : केजरीवाल म्हणतात अधिकारी संपावर, अधिकारी म्हणतात आम्ही कामावर!

'आप'ने आज पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. पंतप्रधानांनीच फूस देवून अधिकाऱ्यांचा संप घडवून आणला असा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरून केला आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2018 05:29 PM IST

दिल्ली 'आप'चा मोर्चा : केजरीवाल म्हणतात अधिकारी संपावर, अधिकारी म्हणतात आम्ही कामावर!

नवी दिल्ली,ता.17 जून : राजधानी दिल्लीत राज्य सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यामध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागण्या मान्य व्हाव्यात अशी मागणी करत 'आप'ने आज पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. पंतप्रधानांनीच फूस देवून अधिकाऱ्यांचा संप घडवून आणला असा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरून केला आहे.

राज्यपालांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि आणि त्यांचे काही मंत्री गेल्या आठवडाभरापासून ठिय्या देवून बसले आहेत. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे.

दिल्लीतले आयएएस अधिकारी संपावर आहेत ते सहकार्य करत नाही असा केजरीवाल यांचा मुख्य आरोप आहे. अधिकारी असहकार्य करत असल्यानं प्रशासनाचं कामकाज ठप्प झाल्याची तक्रारही केजरीवाल यांनी केली आहे. अधिकाऱ्यांच्या या संपात तोडगा काढावा असं गाऱ्हानं घेवून केजरीवाल नायब राज्यपाल बैजल यांची भेट घ्यायला गेले होते. मात्र त्यांनी भेट नाकारल्यानं केजरीवालांनी त्यांच्याच घरी मुक्काम ठोकला.

केजरीवालांच्या मदतीसाठी ममतादीदी-कुमारस्वामींसह 4 मुख्यमंत्री आले धावून !

केजरीवालांच्या मागण्या

Loading...

  •  प्रशानाचे प्रमुख असल्याने नायब राज्यपालांनी हस्तक्षेप करत आयएएस अधिकाऱ्यांना संप मागे घेण्यास भाग पाडावं.
  •  काम बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कडक करावाई करावी.
  •  'रेशनचं सामान नागरिकांच्या दारी' या योजनेला मंजूरी द्यावी.

नायब राज्यपालांची भूमिका

आयएएस अधिकारी संपावर नाहीत त्यामुळं संप मागे घेण्याचा प्रश्नच नाही अशी भूमिका नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी घेतलीय आहे. तर रेशनची योजना अव्यवहार्य असल्याचं सांगत राज्यपालांनी ही योजना रोखून धरलीय.

दिल्लीचा छोटा प्रश्न सुटत नाही, तर देशाचे कसे सोडवणार?

आम्ही संपावर नाही

दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन आयएएस अधिकाऱ्यांची संघटनेनं आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही नियमित कामकाज करत असून संपावर नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. आमची प्रतिमा खराब करण्यात येत आहेत अशी तक्रारही त्यांनी केलीय.

पंतप्रधानांनी पेच सोडवावा

निती आयोगाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीनं सोडवावा अशी मागणी केली. आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू, कर्नाटकचे एच.डी. कुमारस्वामी, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी ही मागणी केलीय.

काही महिन्यांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आपच्या एका आमदाराने दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या कानशिलात लगावल्यानं अधिकारी आणि दिल्ली सरकार यांच्या संघर्षाची ठिणगी पडली होती.

हेही वाचा...

रमजान महिना संपला, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध होणार कारवाई!

गौरी लंकेश यांचा मारेकरी परशुराम वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटी पथकाकडे

FIFA वर्ल्डकप प्रेमींसाठी आज सुपर संडे ,एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती

बाॅक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी 'रेस 3' सर्वात पुढे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2018 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...