दिल्लीनंतर आपचं मिशन महाराष्ट्र, शिवसेना आणि MIMच्या बालेकिल्ल्यातून देणार आव्हान

दिल्लीनंतर आपचं मिशन महाराष्ट्र, शिवसेना आणि MIMच्या बालेकिल्ल्यातून देणार आव्हान

सर्व 115 जागांसाठी उमेदवार उभं करण्याच्या निर्णयावर येत्या 25 फेब्रुवारीला मुलाखती घेण्यात येतील, अशी माहिती सुभाष माने यांनी दिली.

  • Share this:

औरंगाबाद, 09 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या सर्वच्या सर्व एक्झिट पोल्सनुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचं (AAP) सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीत 'आप'ला स्पष्ट बहुमत मिळेल, असं एक्झिट पोलचे आकडे सांगतात. दिल्लीच्या निवडणुकांनंतर औरंगाबाद महापालिका निवडणूक हे अरविंद केजरीवालांचं मिशन असणार आहे. कारण महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्व 115 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष डॉ. सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्व 115 जागांसाठी उमेदवार उभं करण्याच्या निर्णयावर येत्या 25 फेब्रुवारीला मुलाखती घेण्यात येतील, अशी माहिती सुभाष माने यांनी दिली. औरंगाबाद महापालिका निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे आपने दिल्लीनंतर आता औरंगाबादमध्ये लक्ष केंद्रीत केलं आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये शहरात विकास झाला नाही. याच मुद्द्यांवर फोकस करून आता केजरीवाल 115 जागांवर आपचे उमेदवार उभे करणार आहे. सत्तेवर आल्यास काय करू याबाबत त्यामध्ये आश्वासने असतील असे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष इसाक अंडेवाला, रिझवान शेख, अजब मानकर, सतीश संचेती यांची उपस्थिती होती.

दिल्लीच्या Exit Poll ने वाढवलं अमित शहांचं टेन्शन, 'हे' आहे कारण

एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी ती एक डोकेदुखी ठरू शकते. कारण आता अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष नसले तरीही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अमित शहा यांनीच अरविंद केजरीवाल यांना सर्वाधिक टार्गेट केलं होतं. तसंच यंदा आम्ही 45 पेक्षा अधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करू, असा आत्मविश्वासही प्रचार संपताना अमित शहा यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडे खरे ठरून दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार स्थापन झाल्यास अमित शहांचा अंदाज चुकू शकतो.

नक्की काय म्हणाले होते अमित शहा?

'निवडणुकीदरम्यान लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. खोटी आश्वासने, लांगूलचालन आणि अराजकता याने त्रस्त झालेल्या दिल्लीला आता फक्त विकास पाहिजे. दिल्लीमध्ये भाजपला जे समर्थन मिळत आहे त्यानुसार 11 फेब्रुवारीला भाजप दिल्लीत 45 पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करेन,' असा विश्वास प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा यांनी व्यक्त केला होता.

काय आहेत 'एक्झिट पोल'चे आकडे?

दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी आम आदमी पार्टीला 49 ते 63 जागा, भाजपला 5 ते 19 जागा तर काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी आणि सी व्होटरचा एक्झिट पोल सांगतो.

'टाइम्स नाऊ'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत 'आप'ला 44 जागा तर भाजप 26 जागा मिळतील, मात्र काँग्रेसला भोपळा फोडता येणार नाही.

'रिपब्लिक'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत कोण मारणार बाजी?

AAP : 48-61

BJP : 9-21

CONG : 0-1

Newsx- Neta चा एक्झिट पोल काय सांगतो?

AAP: 50-56

BJP: 10-14

Congress: 0

2015 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेसचा अक्षरश: धुव्वा उडवला होता. या निवडणुकीत 'आप'ला दिल्लीत 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपच्या खात्यात अवघ्या 3 जागा जमा झाल्या, तर कधीकाळी दिल्लीत निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

मागील निवडणुकीत कोणते मुद्दे ठरले प्रभावी?

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचं अल्पमतातील सरकार कोसळून दिल्लीत 2015 साली पुन्हा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत केजरीवालांचीच जादू दिसून आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा जिंकणाऱ्या भाजपला काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. नरेंद्र मोदी यांचं लोकप्रियतेच्या वादळाची दिल्लीच्या मैदानात मात्र अरविंद केजरीवालांनी हवा काढून टाकली.

पाणी, वीज, रस्ते, शिक्षण अशा मुद्द्यांवरून केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनांवर दिल्लीच्या जनतेनं विश्वास टाकला. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठ्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं.

यंदा दिल्लीतील ओपिनियन पोल काय सांगतात?

दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. निवडणुकांपूर्वी विविध संस्थांचे ओपिनियन पोल येत असतात. या ओपिनियन पोलनी आम आदमी पार्टीवर पुन्हा एकदा दिल्लीची जनता विश्वास दाखवेल, असा अंदाज वर्तवला आहे.

टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलनुसार, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी मजबूत असून या निवडणुकीत ते 54-60 जागांवर विजय मिळवू शकतात. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला 10-14 जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलनुसार, कॉंग्रेसला केवळ 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे ABP News- C Voter Opinion Poll च्या पोलचा अंदाज?

AAP- 42 ते 56

भाजप- 10 ते 24

काँग्रेस- 0 ते 4

First published: February 9, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading