• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • दिल्लीनंतर 'आप'ली डोंबिवली? आम आदमी पार्टीची बॅनरबाजी

दिल्लीनंतर 'आप'ली डोंबिवली? आम आदमी पार्टीची बॅनरबाजी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपच्या बॅनरबाजीमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:
डोंबिवली, 12 फेब्रुवारी : आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभेत मोठा विजय मिळवत हॅट्रटीक साधली आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार असल्यानं सर्वत्र ठिकाणी जल्लोष करण्यात आला. त्याच धर्तीवर आज डोंबिवलीत पूर्व आणि पश्चिमेला आम आदमी पार्टीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपच्या बॅनरबाजीमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  डोंबिवली स्थानकाजवळ हे बॅनर लावण्यात आलं आहे.  आपच्या बॅनरवर  जाती धर्माचे राजकारण करणाऱ्या पक्षांना टोला हाणत म्हटले आहे की, दिल्लीत बदल होऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही. तसंच आपल्या महाराष्ट्राला सक्षम आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करूया, असंही म्हटलं आहे. येणाऱ्या कल्याण डोंबिवली महपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पार्टी आपले उमेदवार उभे करू शकते असं जाणकारांचं मत आहे आणि केडीएमसी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बॅनरबाजी केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. अरविंद केजरीवाल यांची 'आप'च्या नेतेपदी निवड, 16 फेब्रुवारीला घेणार शपथ दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्लीत दुसऱ्यांदा विक्रमी बहुमत मिळालं. त्यानंतर केजरीवाल हे 'व्हॅलेंटाईन डे'ला शपथ घेतील असं बोललं जात होतं. मात्र आता त्यांच्या शपथविधीची तारीख जाहीर झालीय. केजरीवाल हे आपल्या मंत्रिमंडळासह 16 फेब्रुवारीला शपथ घेतील. रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. केजरीवाल यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेऊन त्यांना सरकार बनविण्याचा दावा सादर केला आणि तारखेचीही माहिती दिली. केजरीवालांसाठी व्हॅलेंटाईल डे खास असल्याने ते याच दिवशी शपथ घेतील असं म्हटलं जात होतं मात्र आता तारीख जाहीर झाल्याने तो समज खोटा ठरलाय. आज सकाळी सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यात केजरीवालांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं. याच बैठकीत त्यांची आप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आलीय. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शपथ घ्यावी असा आग्रह काही आमदारांचा होता. मात्र काहींनी 16 तारीख सुचवली. शेवटी 16 तारीख ठरविण्यात आल्याचं आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published: