शिवसेनेचे युवराज जनतेच्या दारी, आदित्य ठाकरे 'अ‍ॅक्शन'मध्ये

'जन आशीर्वाद यात्रे'च्या माध्यमातून आदित्य यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:13 PM IST

शिवसेनेचे युवराज जनतेच्या दारी, आदित्य ठाकरे 'अ‍ॅक्शन'मध्ये

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला आज जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथून धडाक्यात सुरुवात झाली. आदित्य यांची ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे दिग्गज नेते कसून तयारी करत आहेत.

खुद्द खासदार संजय राऊत हे आदित्य यांच्यासोबत असून आदित्य यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे. आत्तापर्यंत संजय राऊत हे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं कायम सांगत होते. पहिल्यांदाच त्यांनी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी भूमिका मांडली आहे.

आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या आधी सर्व जनतेला सांष्टांग दंडवत घातला. ते म्हणाले, जनता हीच माझ्यासाठी देव आहे. म्हणूनच मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी तुम्हाला नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेतोय.

चार हजार किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा सर्व महाराष्ट्रात जाणार आहे. या यात्रेत ते विविध गटांशी संवाद ही साधणार असून त्याला आदित्य संवाद असं नाव देण्यात आलंय.

Loading...

नवीन महाराष्ट्र घडवायचा असेल तर सर्वांची मनं जिंकावी लागतील. अगदी विरोधकांचीसुद्धा. 'ही प्रचार यात्रा नाही तर तीर्थ यात्रा आहे. मी मतं मागायला आलेलो नाही असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यातून विधानसभा निवडणुकीआधी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होणार असून. पक्षाचं संख्याबळ वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...