तुमच्या आधार नंबरचा गैरवापर होऊ शकतो, असं करा आधार कार्ड करता लॉक

ओळखपत्र म्हणून आता सगळीकडे 'आधार'चीच मागणी केली जाते. अशात आपल्या 'आधार'चा कुणी गैरवापर तर करणार नाही ना? याचं टेंशन प्रत्येकालाच असतं.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 05:38 PM IST

तुमच्या आधार नंबरचा गैरवापर होऊ शकतो, असं करा आधार कार्ड करता लॉक

नवी दिल्ली, 21 मे : महत्त्वाची कागदपत्र म्हटल्यानंतर भारतात आधार कार्डचा पहिला क्रमांक लागतो. अशी बरीच कामं आहेत जी तुम्हाला आधार कार्डाशिवाय करताच येत नाहीत. ओळखपत्र म्हणून आता सगळीकडे 'आधार'चीच मागणी केली जाते. इतकंच नव्हे तर बँक खातं उघडण्यापासून ते पासपोर्ट तयार करण्यापर्यंत आधार कार्डचीच मागणी केली जाते. अशात आपल्या 'आधार'चा कुणी गैरवापर तर करणार नाही ना? याचं टेंशन प्रत्येकालाच असतं. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सांगायचं झालं तर, तुम्ही तुमच्या 'आधार'चा बायोमेट्रीक डेटा अगदी घरी बसल्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही लॉक करु शकता. त्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
Step 1 - सगळ्यात पहिले तुम्हाला आधार कार्ड ची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावं लागेल.

Loading...

Step 2 - साइट उघडल्यानंतर आधार सव्हिसवर क्लिक करा जिथे तुम्हाला लॉक/अनलॉक असं ऑप्शन मिळेल.

Step 3 - लॉक/अनलॉक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवी लिंक ओपन होईल. ती लिंक उघडल्यानंतर तुम्हाला त्यात आपला आधार क्रमांक आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल. ज्यानंतर आधारला जेडलेल्या तुमच्या मोबाइल क्रमांकावर OTP येईल. ओटीपी टाकताच तुमचं अकाउंट Login होईल.

Step 4 - त्यानंतर तुम्हाला कोड टाकल्यानंतर तुम्हाला ‘Enable’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. क्लिकवर क्लिक करताच तुम्हाला एक मॅसेज येईल ज्यात 'Congratulation! Your Biometrics Is Locked', असं लिहिलेलं असेल.

तरुणांसाठी नेव्हीमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी; असा करा अर्ज

Unlock करण्यासाठी परत याच प्रोसेसने तुम्हाला तुमचं लॉक केलेलं Aadhaar अनलॉक करता येतं. अनलॉक करतानासुद्धा Enable आणि Disable असं ऑप्शन येईल. त्यात सिक्योरिटी कोड टाकल्यानंतचर क्लिक करताच तुमच्या आधारचा डेटा अनलॉक होईल.

SMS द्वारे असं करा Lock - ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा आधारचा डेटा लॉक आणि अनलॉक करता येतो. त्यासाठी तुम्हाला UIDAI च्या 1947 या क्रमांकावर SMS करावा लागेल. SMS मध्ये ‘GETOTP’ लिहून एक स्पेस द्यावी आणि नंतर तुमच्या आधारचे शेवटचे 4 नंबर लिहून 1947 या क्रमांकावर SMS पाठवाला लागेल. त्यानंतर UIDAI तुमचा आधार Lock करेल आणि तसा तुम्हाला SMS सुद्धा मिळेल. ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा आधार Unlock करताना हीच प्रोसेस करावी लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: aadhaar
First Published: May 21, 2019 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...