सावधान! Indane गॅसच्या वेबसाईटवर 67 लाख ग्राहकांचा AADHAAR डेटा लीक

वेबसाईटचं हे पेज गूगलशी इंडेक्स्ड होतं. त्यामुळे हे सगळे जण पाहू शकतात. त्यामुळे लीक झालेले आधार नंबर सगळे जण पाहू शकतात.

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 03:54 PM IST

सावधान! Indane गॅसच्या वेबसाईटवर 67 लाख ग्राहकांचा AADHAAR डेटा लीक

मुंबई, 19 फेब्रुवारी : आधार डेटा लीक होणाऱ्यावरून सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात प्रसिद्ध गॅस कंपनी इंडेनच्या अधिकृत वेबसाईटवर लाखो नागरिकांचे आधार नंबर लीक झाले आहेत. त्यामुळे कोणताही मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेबसाईट Techcrunch सांगितले की सिक्योरिटीमध्ये झालेल्या चुकीमुळे आधार नंबर लीक झाले आहेत. वेबसाईटचं हे पेज गूगलशी इंडेक्स्ड होतं. त्यामुळे हे सगळे जण पाहू शकतात. त्यामुळे लीक झालेले आधार नंबर सगळे जण पाहू शकतात.

आणखी एका सिक्योरिटी रिसर्चर इलियट एंडरसनने त्याच्या ब्लॉग पोस्टमध्ये आधार कार्ड नंबर लीक झाल्याची माहिती दिली आहे. रिसर्चर्सच्या सांगण्यानुसार, त्यांना खबर लागली की इंडेनच्या अधिकृत वेबसाईटवरून लाखो लोकांचे आधार नंबर लीक झाले आहेत.


हेही वाचा : बाप भारतात होता मंत्री तर मुलगा पाकिस्तानी सैन्यात, तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?

Loading...

या सगळ्यानंतर तातडीने पेजवरून सगळे आधार नंबर काढून टाकण्यात आले. पण Techcrunch च्या बातमीनुसार, पेजवर फक्त नागरिकांचे आधार नंबरच नाही तर यूजर्स आयडीस आणि नावंदेखील दिसत होती.

रिसर्चर्सचा दावा आहे की त्यांनी इंडेनच्या वेबसाईटवर 11,000 डीलर्सचा डेटा मिळाला जो कस्टम बिल्ट स्क्रिप्टच्या ब्लॉक होण्याआधई 5.8 मिलियन (58 लाख) ग्राहक वापरू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, 6.7 मिलियन (67 लाख)ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे.

Techcrunch ने त्यांच्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, त्यांनी लीक झालेल्या आधार नंबरला UIDAI वेब-बेस्ड वेरिफेकेशन टूलच्या माध्यमातून वेरिफाय केलं ज्यात सगळे आधार नंबर बरोबर होते. वेबसाईटवर आधार नंबर लीक कसे झाले आणि ते किती वेळ वेबसाईटवर दिसत होते याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.


VIDEO : आमच्यावर आक्रमण करण्याचा भारतानं विचारही करू नये - इम्रान खान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...