S M L

'होम मिनिस्टर'चे लाडके भाऊजी झाले 'मिनिस्टर' !

मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2018 07:08 PM IST

'होम मिनिस्टर'चे लाडके भाऊजी झाले 'मिनिस्टर' !

मुंबई, 18 जून : शिवसेनेचे सचिव आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांना आता राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळालाय. आदेश बांदेकर हे सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या निर्णयामुळे आदेश बांदेकर यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आलाय.

याला म्हणतात फुटबॉल!चाहत्यांच्या नुसत्या जल्लोषानं मेक्सिकोत ‘भूकंप’

राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यामुळे सिद्धीविनायक न्यासाकडून आता बांदेकरांना दरमहा 7500 मानधन, समितीच्या बैठकीस उपस्थित राहिल्यास प्रतिबैठकीस 500 रूपये भत्ता आणि निवासी दूरध्वनीचा खर्च मासिक 3000 रूपये तसंच वाहनासाठी वर्षाला 72000रूपये मिळणार आहे. मात्र  त्यांना गाडीवर लाल दिवा लावता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 07:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close