लॉकडाऊनमुळे बंदी असूनही पार्टी करायला गेले धबधब्यावर, तब्बल 24 तासानंतर सापडला तरुणाचा मृतदेह

लॉकडाऊनमुळे बंदी असूनही पार्टी करायला गेले धबधब्यावर, तब्बल 24 तासानंतर सापडला तरुणाचा मृतदेह

लॉकडाऊनमुळे धबधबे आणि इतर ठिकाणी फिरायला जाण्यासाठी बंदी आहे. पण या नियमांचं पालन न केल्यामुळे तरुणाने आपला जीव गमावल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

मनमाड, 03 ऑगस्ट : पावसाळा म्हटलं की फिरायला आणि पिकनिकला जाणाऱ्यांची धूम असते. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे सगळे पिकनिक स्पॉट बंद आहेत. लॉकडाऊनमुळे धबधबे आणि इतर ठिकाणी फिरायला जाण्यासाठी बंदी आहे. पण या नियमांचं पालन न केल्यामुळे तरुणाने आपला जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. नांदगावच्या चांदेश्वरी धबधब्याखाली बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर बारगळ असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. किशोर हा मित्रासोबत पिकनिकसाठी धबधब्यावर फिरण्यासाठी गेला होता. नांदगावच्या चांदेश्वरी धबधब्याच्या डोहात तरुणाचा बुडून मृत्यू झाला असून 24 तासानंतर त्याचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागला. पिकनिकसाठी धबधब्यावर आल्यानंतर पोहोण्यासाठी धबधब्याच्या डोहात उतरला होता.

रोहित पवारांचं अनोख रक्षाबंधन, जगाला वाचवणाऱ्या बहिणीचा घेतला आशीर्वाद

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे धबधब्यावर येण्यास बंदी असतांना देखील त्याला झुगारून इथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे अशा घटना समोर येत असल्याची तक्रार समोर येत आहेत.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

Weather Alert: मुंबईत ऑरेंज तर या भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस पथक आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी बचावासाठी दाखल झाली. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे किशोरचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तब्बल 24 तासांनंतर बाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी किशोरचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. किशोरच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. किशोरच्या अशा जाण्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 3, 2020, 12:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या