Home /News /news /

Nashik young farmer : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सगळंच गमावलेल्या ‘या’ युवा शेतकऱ्याने केली शेतीत क्रांती

Nashik young farmer : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सगळंच गमावलेल्या ‘या’ युवा शेतकऱ्याने केली शेतीत क्रांती

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत (corona second wave) टरबुजाचे व्यापारी न मिळाल्याने आणि कमी बाजारभावामुळे या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. मात्र, खचून न जाता यंदाही टरबुजाचा प्रयोग केला (watermelon farming) आणि तो कमालीचा यशस्वी झाला.

    नाशिक, 06 मे : नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी द्राक्ष बागायतदार (grapes farmer) आहेत. बागायती क्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यातील खामखेडा परिसरात प्रामुख्याने मका, कांदा, कोबी तसेच भाजीपाला पिके घेतली जातात. दरम्यान मागच्या काही काळात पावसाने दगा दिल्याने पीकांचे प्रचंड नुकसान झाले. या पीकांना पर्याय म्हणून युवा शेतकरी विशाल संजय बच्छाव याने एक यशस्वी प्रयोग केला आहे. वडिलोपार्जित तीन एकर आणि वाट्याने चार एकर शेती त्याने करण्याचा निर्णय घेतला.  यामध्ये त्याने टरबूज शेती (watermelon farming) करण्याचा निर्णय घेतला. त्यातून अवघ्या 70 दिवसात टरबुजाचे 100 टनांहून अधिक उत्पादन घेत 10 लाखांचे उत्पन्न प्राप्त केले. (nashik young farmer) विशालने आपल्या वडिलोपार्जित शेतीसोबतच चुलते कैलास बच्छाव यांची चार एकर शेती वाट्याने कसायला घेतली. गेल्या तीन वर्षांपासून ते टरबूज तसेच भाजीपाला पीक घेतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत टरबुजाचे व्यापारी न मिळाल्याने व कमी बाजारभावामुळे त्यांचे नुकसान झाले. मात्र, खचून न जाता यंदाही टरबुजाचा प्रयोग केला. फेब्रुवारीत ठिंबक सिंचनाचा उपयोग करून मल्चिंग आंथरून चार एकर क्षेत्रात लागवड केली. (watermelon farming) हे ही वाचा : Mansoon 2022 : यंदा वरुणराजा लवकर बरसणार, 10 दिवस आधीच होणार मान्सूनचं आगमन पाण्याचे व फवारणीचे योग्य नियोजन करीत बहारदार पीक घेतले. नुकतीच टरबूज काढणी सुरू असून, चार एकर क्षेत्रात 100 टन टरबूज निघाले आहे. अजून 15 ते 20 टन चांगल्या प्रतीचा माल निघणार असून दुय्यम मालदेखील 10 टनांपर्यंत निघेल, अशी आशा आहे. सटाणा येथील व्यापार्‍यांमार्फत त्यांनी हा संपूर्ण माल जम्मू-काश्मीर येथे पाठवला आहे. परिसरातील प्रयोगशील शेतकर्‍यांच्या शेतीला भेट देत त्याने टरबूज पिकात हातखंडा मिळवला आहे. आई, वडील, भाऊ असे संपूर्ण कुटुंब शेतीत राबते. आवश्यक तेथे मजुरांची मदत घेतली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शेतकर्‍याने चार एकरात टरबूज फळपिकाची लागवड करून तब्बल 10 लाखांचे विक्रमी उत्पादन घेत शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला. टरबुजाचा दर्जा व गोडवा चांगला असल्याने पहिल्याच तोडणीत 100 टन टरबूज 10 रुपये किलो दराने व्यापार्‍याने खरेदी केला. ही यशोगाथा चर्चेचा विषय ठरली असून, तरुणाचे खामखेडा व परिसरात कौतुक होत आहे.
    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Agriculture, Nashik

    पुढील बातम्या