मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देश पुन्हा हादरला! वृद्धाश्रमाच्या संस्थाध्यक्षासह व्यवस्थापकांकडून Gang Rape चा घृणास्पद प्रकार

देश पुन्हा हादरला! वृद्धाश्रमाच्या संस्थाध्यक्षासह व्यवस्थापकांकडून Gang Rape चा घृणास्पद प्रकार

कोरोनाकाळातही महिलांवरचे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत असं चित्र आहे.

कोरोनाकाळातही महिलांवरचे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत असं चित्र आहे.

कोरोनाकाळातही महिलांवरचे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत असं चित्र आहे.

  • Published by:  News18 Desk
नोएडा, 18 फेब्रुवारी: महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. एकाहून एक हिंसक प्रकार देशभरात समोर येत आहेत. सध्या उन्नावच्या कथित बलात्कार प्रकरणाची चर्चा असताना ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एक बलात्काराची (Rape) घटना घडली आहे. ग्रेटर नोयडाच्या दनकौर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेवर गँगरेप (Gang rape on woman) करण्याचा आरोप या लोकांवर आहे. ही महिला सफाई कामगार (Sanitation worker) म्हणून काम करत होती. पोलिसांनी प्रकरणाचा तपास (police investigation) सुरू केला आहे. पोलिसांच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं, की दनकौर ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या एका वृध्दाश्रमात (old age home) एक महिला काम करत होती. या महिलेनं आश्रमाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकासह चार लोकांविरुद्ध गँगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचादुहेरी हत्याकांड! भर बाजारात कारमध्ये आढळले मृतदेह; गोळ्या घालून केली हत्या पोलीस म्हणाले, की ही केस न्यायालयाच्या आदेशावरून (Court Order) दाखल केलेली आहे. ही महिला आश्रमात सफाई कामगार म्हणून काम करत होती. महिलेचा आरोप आहे, की 5 मे आणि 17 मे 2020 रोजी संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांच्या साथीदारांनी तिच्यावर दोनदा गँगरेप केला. आरोपानुसार, आश्रमाचे प्रबंधक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गॅंगरेपमध्ये साथ दिली. गौतमबुध्द नगर जिल्हा न्यायालयानं मंगळवारी केस दाखल करण्याचा आदेश दिला. यानंतर बुधवारी ठाण्यात केस दाखल केली गेली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत कुणालाच अटक झालेली नाही.
First published:

Tags: Court, Gang Rape

पुढील बातम्या