मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

होंडा सिटी कारला ट्रकची जबर धडक, आई-वडिलांसह दोन मुलं जागीच ठार

होंडा सिटी कारला ट्रकची जबर धडक, आई-वडिलांसह दोन मुलं जागीच ठार

अकोल्यातील मूर्तिजापूर जवळील नागठाणा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

अकोल्यातील मूर्तिजापूर जवळील नागठाणा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

अकोल्यातील मूर्तिजापूर जवळील नागठाणा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

अकोला, 20 जुलै : अकोल्यातील मूर्तिजापूर जवळील नागठाणा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. यात दोन लहान मुलांसह इतर एक महिला एक पुरुषाचा समावेश आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग 6 वर ही घटना घडली आहे. मूर्तिजापूर जवळील नागोली नागठाणा गावाजवळ  नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या होंडा सिटी कार (एमएच 04 बीडब्ल्यू 5259) ला अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच 15 एफव्ही 1413) ने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या धडकेनंतर कारमधील सर्व जण बाहेर फेकले गेले. यात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या अपघातात आई, वडील आणि त्यांची दोन लहान मुलं घटनास्थळीच ठार झाले. तर यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहे.  यातील दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.

हुसेन गुलाम हुसेन(50), साबीया हुसेन हबीब(30) आणि हुसेन हबीब मो.हबीब (35) अशी जखमींची नावं आहे. जखमींना लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आले आहे.

या कारमधील एकूण 7 जण प्रवास करत होते. यात आई-वडील आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Akola